residentional photo
residentional photo

जिल्हा परिषदेत शिवसेना विकास आघाडीसोबत...भुजबळ,राऊत यांच्या बैठकीकडे लक्ष 

नाशिक ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची येत्या 2 जानेवारीला दुपारी एकला निवडणूक होणार आहे. जि.प. अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत शिवसेना कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस शिवसेना यांची महाविकास आघाडी कायम असेल. अशी माहीती शिवसेनेचे संर्पकप्रमुख भाउसाहेब चौधरी यांनी दिली. 

विषय समित्यांची मुदत संपली

जि.प.अध्यक्षपदाची निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विद्यमान अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित,व विषय समितीच्या सभापतीची मुदत 20 डिसेंबरला संपल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक होउन त्यात, शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

भूमिका स्पष्ट
नाशिकला जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिक जि प शिवसेना सदस्यांची बैठक शासकीय विश्रामगृहावर घेत त्यात, शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. बैठकीत,जिल्हा परिषदेतील शिवसेनेची सदस्य संख्या, सध्या कोणत्या पक्षाकडे सभापती पद आहे, याची माहिती त्यांनी घेतली व महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. 

पक्षादेश सर्वांनी मान्य करायचा 
येत्या सोमवार नंतर राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ व शिवसेना नेते संजय राऊत हे एकत्र बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील त्यात, ठरणाऱ्या महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल तो पक्षादेश म्हणून सर्वानी मान्य करावा असे आवाहान केले. बैठकीला, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे,शिवसेना महानगरप्रमुख महेश बडवे उपजिल्हाप्रमुख दिपक खुळे, जि.प. सदस्य भास्कर गावित,शंकरराव धनवटे,बाळासाहेब क्षीरसागर,दीपक शिरसाट,सविता पवार,सुरेखा दराडे, रमेश बोरसे,निलेश केदार,कावजी ठाकरे, वैशाली कुळे,वनिता शिंदे,कान्हेरे छाया गोतरणे,सुरेखा दराडे, दीपक शिरसाट, नयना गावित,सविता पवार,ज्योती वागले, सुनीता पठाडे,रोहिणी गावित,राजेंद्र चारोस्कर,हरिदास लोकरे,कमल आहेर आदीसह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com