करवाढी मागे भाजपचं, आयुक्तांच्या खांद्यावर बंदुक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नाशिक- एक एप्रिल पासून शहरात नवीन मिळकतींवरील कराच्या भाडेमुल्य दरात पाच ते सहा पट कर आकारणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याच्या उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेने भाजपला टारगेट करून करवाढी मागे सत्ताधारी भाजपचं असून आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्यात आला आहे.

नाशिक- एक एप्रिल पासून शहरात नवीन मिळकतींवरील कराच्या भाडेमुल्य दरात पाच ते सहा पट कर आकारणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याच्या उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेने भाजपला टारगेट करून करवाढी मागे सत्ताधारी भाजपचं असून आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्यात आला आहे.

आयुक्तांच्या तुघलकी निर्णयाला खरोखर विरोध असेल तर सत्ताधारी भाजपने अवाजवी करवाढी बद्दल भुमिका स्पष्ट करावी, अन्यथा करवाढीबद्दल जनतेच्या दरबारात जावून नागरिकांना करवाढ मान्य आहे किंवा नाही याबाबत मिसकॉलच्या माध्यमातून अभियान राबविणार असल्याचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. 

महापालिका आयुक्तांनी एक एप्रिल पासून नवीन मिळकतींच्या भाडेमुल्य दरात पाच ते सहा पट वाढ केली आहे. त्यामुळे शहरात पुढील वर्षांपासून नागरिकांना हजारो रुपये अतिरिक्त अदा करावे लागणार आहे. यापुर्वी सरसकट सर्व मिळकतींवर करवाढीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. महासभेने स्थायी समितीचा अठरा टक्के करवाढीचा प्रस्ताव मान्य केला.

 भाडेमुल्य दरात करवाढ करण्याचा आयुक्तांचा अधिकार असल्याचा दावा करत एक एप्रिल पासून नवीन मिळकतींवर करवाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता मोकळ्या जमिनी देखील कराच्या फेऱ्यात येणार असून त्यावर तेरा टक्के कर लागु होणार आहे. करवाढी बाबत श्री. बोरस्ते यांनी पालिका मुख्यालयात माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. विश्‍वासात न घेता वाढ करण्यात आल्याचा आरोप करताना सत्ताधारी पक्षाचे डोके ठिकाणावर नसल्याची टिका केली.

करवाढीचा बाण आयुक्तांच्या धनुष्यातून सुटला असला तरी त्यामागे भाजप आहे. सत्ताधारी भाजपचा खरोखर करवाढीला विरोध असेल तर करवाढीबाबत नेमकी भुमिका स्पष्ट करावी. नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठया प्रमाणावर करवाढ करून अन्याय करण्यात आल्याचे श्री. बोरस्ते यांनी आरोप केला.

करवाढी बाबत महापौर रंजना भानसी यांनी देखील भुमिका स्पष्ट करावी, त्यांना दरवाढ मान्य नसेल तर पक्षाचे जोडे बाजूला काढून विरोधी पक्ष त्यांना साथ देतील असे बोरस्ते यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेचे मिस कॉल अभियान 
सत्ताधारी भाजपने याबाबत भुमिका स्पष्ट करावी अन्यथा शिवसेना जनतेच्या दरबारात जाणार आहे. यात लोकांची देखील बाजू ऐकून घेतली जाणार असून लोकांनाचं मिस कॉलच्या माध्यमातून करवाढ मान्य आहे कि नाही असा सवाल विचारून कौल घेतला जाणार आहे. नाशिककरांचा करवाढीला विरोध असल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारण्याचा ईशारा त्यांनी दिला. 
 

Web Title: marathi news shivsena target bjp