कमी दाबाने पाणी उपकरण

water
water

नाशिक: कमी दाबाने पाणी सोडणाऱ्या उपकरणांचा वापर घराघरांमध्ये होऊ लागला तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊन भविष्यातील संकट टाळता येईल. अशा उपकरणांमुळे पाण्यात हवामिश्रित होऊन गरजेपुरतेच पाणी सोडले जात असल्याने पाणी वाया जात नाही. यासंदर्भात उपकरणाची चाचणी करण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर बेंगळुरू व नोयडात लॅब उभारली जाणार असून, त्यावर आधारित रेटिंगनुसार कदाचित भविष्यात उपकरणे मिळतील, अशी माहिती इंडियन प्लंबिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुमितसिंग अरोरा यांनी मंगळवारी (ता. 13) येथे पत्रकार परिषदेत दिली. 

प्लंबिंग असोसिएशनमार्फत बुधवारी (ता. 14) होत असलेल्या कार्यक्रमानिमित्त ते नाशिकला आले असून, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुरुमितसिंग अरोरा म्हणाले, की इंडियन प्लंबिंग स्कील कौन्सिलच्या माध्यमातून दहा वर्षांत बारा लाख व्यक्‍तींना प्लंबिंगचे तांत्रिक प्रशिक्षण देण्याचे ध्येय ठेवले. आतापर्यंत 28 हजार व्यक्‍तींना प्रशिक्षण व प्रमाणपत्र दिले गेले. अन्य कौन्सिलच्या तुलनेत प्लंबिंग कौन्सिलची कामगिरी समाधानकारक आहे. 

पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये होणाऱ्या गळतीसंदर्भात प्रधानमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येत्या 27 तारखेला महत्त्वाच्या खात्यांतील सचिवांसोबत दिल्लीत बैठकदेखील होणार आहे. प्लंबिंग हे विज्ञान हा विचार रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. पाण्याचा योग्य वापर होण्यासह पुनर्प्रक्रियेसाठीदेखील प्रयत्न होण्याची गरज असून, त्यादृष्टीने काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी 26 ऑक्‍टोबरला मुंबईत वर्ल्ड प्लंबिंग कौन्सिलची परिषद होणार असून, त्यात परदेशातील दोनशे सदस्यांसह देशभरातील आठशे सदस्य सहभागी होणार आहेत. 

रेन वॉटर हार्वेस्टिंग लॅब उभारणार-शेटे
    वाहतूक नियमांविषयी जनजागृतीसाठी चिल्ड्रन एज्युकेशन ट्राफिक पार्क कार्यरत आहे. याच धर्तीवर पाणीबचतीसह पावसाळी पाण्याच्या योग्य वापरासंदर्भात जनजागृतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग लॅब उभारण्याची तयारी आहे. प्रशासनाने यासंदर्भात सहकार्य केल्यास असोसिएशनमार्फत लॅब उभारली जाईल, अशी माहिती नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे यांनी दिली. ते म्हणाले, की आयपीएससीमार्फत नाशिकमध्ये साडेचारशे व्यक्‍तींना प्रशिक्षण दिले असून, त्यांच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ प्राप्त झाले आहे. 

भुजबळ नॉलेज सिटीत आज कार्यक्रम 
इंडियन प्लंबिंग असोसिएशनद्वारे मेट, भुजबळ नॉलेज सिटी येथे बुधवार (ता. 14)पासून दोनदिवसीय राज्यस्तरीय प्लंबिंग परिषद होणार आहे. सकाळी दहाला राष्ट्रीय अध्यक्ष गुरुमितसिंग अरोरा यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. "प्लंबिंग इंजिनिअरिंगमधील नवे प्रवाह' वर आधारित परिषदेत नामवंत वक्‍ते मार्गदर्शन करतील, अशी माहिती शेटे यांनी दिली. प्लंबिंग क्षेत्रातील बारकावे तज्ज्ञांद्वारे सांगितले जाणार असून, अन्य विविध बाबींवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडियन प्लंबिंग असोसिएशनद्वारे मेट, भुजबळ नॉलेज सिटी येथे बुधवार (ता. 14)पासून दोनदिवसीय राज्यस्तरीय प्लंबिंग परिषद होणार आहे. सकाळी दहाला राष्ट्रीय अध्यक्ष गुरुमितसिंग अरोरा यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. "प्लंबिंग इंजिनिअरिंगमधील नवे प्रवाह' वर आधारित परिषदेत नामवंत वक्‍ते मार्गदर्शन करतील, अशी माहिती शेटे यांनी दिली. प्लंबिंग क्षेत्रातील बारकावे तज्ज्ञांद्वारे सांगितले जाणार असून, अन्य विविध बाबींवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com