तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्‍वरला जाण्यासाठी ईदगाह मैदानावरुन व्यवस्था 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नाशिक : श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या पार्श्‍वभूमीवर भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे तीनशे जागा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. रविवारी (ता.18) सकाळी आठपासून या जादा गाड्या त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदानावरुन सोडल्या जातील. याशिवाय शहर परीसरातील विविध भागांतून बसफेऱ्यांची सुविधा उपलब्ध असेल. 

मेळा बसस्थानकाच्या जागी बसपोर्ट उभारणीचे काम सुरू असल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ईदगाह मैदानावरुन बससेवेचे संयोजन करण्यात आले आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता त्यांच्या सुविधेसाठी तीनशे बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच बसगाड्यांसाठी धावपळ होऊ नये, यासाठी मैदान परीसरात विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी आगार दोन मार्फत शिवाजी चौक, विजयनगर, पवननगर, त्रिमुर्ती चौक मार्गे तीन फेऱ्या प्रायोगिक स्वरूपात त्र्यंबकेश्‍वरसाठी सोडल्या जाणार आहेत.ईदगाह मैदानावरुन सुटणाऱ्या बसगाड्या त्र्यंबकरोडकडील गेटने बाहेर पडून त्र्यंबकेश्‍वरकडे रवाना होतील. तर त्र्यंबकेश्‍वरहून शहरात येणाऱ्या बसगाड्या भवानी सर्कल येथून उजव्या बाजूने वळून चांडक सर्कल येथून ईदगाह मैदानाच्या मागील बाजूच्या प्रवेशद्वाराने आत दाखल होतील. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shravni somwar