#BattleForNashik लोकसभेसाठीचे तिन्ही इच्छुक उमेदवार  श्रीराम चरणी लीन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

पंचवटीः श्रीराम जन्मोत्सवासाठी आज पंचवटीतील श्रीराम मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती. सद्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने विद्यमान खासदार व भाजप सेना युतीचे उमेदवार हेमंत गोडसे, माजी खासदार व कॉंग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ व अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी श्रीरामाच्या चरणी लीन होत विजयासाठी साकडे घातले. यावेळी तिन्ही इच्छुकांचा ट्रस्टतर्फे हार, श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांचे काढलेले फोटो थोड्याच वेळात सोशल मिडियावर व्हायरलही करत विजयाचे दावेही सुरू केले. 

Web Title: marathi news shriram navmi jayanti