vidhansabha2019 सिन्नरला राष्ट्रवादीचा झेंडा,चुरशीच्या लढतीत कोकाटे विजयी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

सिन्नरः विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड.माणिकराव कोकाटे यांनी बाजी मारली.शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यावर 2072 मतांची आघाडी घेत त्यांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत विजय मिळवला.सकाळी 8 वाजता सुरु झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासुनच महायुतीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यावर महाआघाडीचे उमेदवार ऍड.माणिकराव कोकाटे यांनी मतांची आघाडी घेतली होती.ती कायम ठेवत अखेरच्या फेरीपर्यंत टिकवत विजय मिळवला.निवडणुकीत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात पहील्यापासुनच आघाडी घेतली होती.पूर्वभागात मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणुक चुरशीची होईल याचा अंदाज आला होता.ऍड.कोकाटे यांचा बालेकिल्ला असणाऱ्य

सिन्नरः विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड.माणिकराव कोकाटे यांनी बाजी मारली.शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यावर 2072 मतांची आघाडी घेत त्यांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत विजय मिळवला.सकाळी 8 वाजता सुरु झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासुनच महायुतीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यावर महाआघाडीचे उमेदवार ऍड.माणिकराव कोकाटे यांनी मतांची आघाडी घेतली होती.ती कायम ठेवत अखेरच्या फेरीपर्यंत टिकवत विजय मिळवला.निवडणुकीत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात पहील्यापासुनच आघाडी घेतली होती.पूर्वभागात मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणुक चुरशीची होईल याचा अंदाज आला होता.ऍड.कोकाटे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये श्री.वाजेंना चांगली मते मिळाल्याचे दिसुन आले.
अंतिम मतदानाची आकडेवारी
ऍड.माणिकराव कोकाटे - 97011
राजाभाऊ (पराग) वाजे - 94939
राजु यादव-762
मनोहर दोडके-285
विक्रम कातकाडे-2886
शरद शिंदे-321
किरण सारुक्ते-258
विलास खैरनार-527
नोटा-1709


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sinner assambly