स्मार्ट सिटीचे सीईओ थवील यांची लवकरच उचलबांगडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नाशिक- नगरसेवकांचे फोन न उचलणे, माहीत मागूनही न देणे, स्मार्ट प्रकल्पांच्या कामांना विलंब अशा अनेक कारणांवरून नगरसेवकांच्या हिटलिस्टवर असलेले स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल महासभेत सदस्यांच्या आरोपांवर कुत्सितपणे हसल्याने अख्खी महासभा त्यांच्यावर उलटतं गेल्या दोन-अडिच वर्षांपासूनचा संताप बाहेर काढला. थविल यांची महासभेतून हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली अखेरीस महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाने कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने त्यांची उचलबांगडी अटळ असल्याचे मानले जात आहे. 

   स्मार्ट सिटी कंपनीवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून थविल यांच्या कारभारावर टिका होत आहे. महापालिका व कंपनीचा स्वतंत्र कारभार असल्याचे मत त्यांनी अनेकदा व्यक्त केले आहे. त्यातून हा संघर्ष निर्माण झाला आहे. नगरसेवक व स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांचे फोन न घेता त्यांच्याशी उर्मट भाषा वापरण्यावरून अनेकदा ते टिकेचे धनी झाले होते. दोन महिन्यांपुर्वी स्काडा मीटर बसविण्याच्या निविदा प्रक्रियेवरून ते वादात सापडले होते. स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष कुंटे यांच्याकडे त्यांच्या विषयी तक्रारी झाल्या. आजच्या महासभेत थविल यांच्या वागणुकीवरच्या चर्चेतचं सदस्यांचा अर्धा वेळ खर्च झाला.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news smart city