गोदावरीच्या पुररेषेत आठशे झाडे लागवड,स्मार्ट सिटी कंपनीचा वादग्रस्त निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नाशिक: गोदावरी नदीच्या पुररेषेत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीने आठशे झाडे लावण्याचा प्रस्ताव तयार केला असून अमलात येण्यापुर्वीचं सदरचा प्रस्ताव वादात सापडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यापुर्वी गोदापार्क व गोदाघाट पुराच्या पाण्यात वाहून केले असताना देखील सतरा लाख रुपये खर्च करून झाडे लावण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत एनएमएससीडीसीएल कंपनीच्या वतीने गोदावरी संवर्धन व सौंदर्य खुलविण्यासाठी प्रोजेक्‍ट गोदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी 512 कोटी रुपयांचा खर्चाचे बजेट तयार करण्यात आले आहे. हरि क्षेत्र विकास अंतर्गत गोदाघाटांचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. गोदाघाटांना पौराणिक लुक देणे, पुलाची निर्मिती, पेव्हर ब्लॉक बसविणे, दगडी बेंच बसविणे, सायकल ट्रॅकची निर्मिती, कारंजे आदींचा त्यात समावेश आहे. गोदाघाट सौंदर्यीकरण करतानाचं आता स्मार्ट सिटी कंपनीतर्फे गोदावरी नदीच्या काठी दहा ते वीस फुट उंचीची आठशे झाडांचे रोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सतरा लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. पंरतू गोदावरीला दरवर्षी पुर येतो त्या पुरात काठावरील घरांमध्ये पाणी शिरून आर्थिक नुकसान होते. मनसेच्या सत्ताकाळात गोदावरी काठी वीस ते पंचवीस फुटांचे रेडीमेड झाडे लावण्यात आली होती परंतू पुराच्या पाण्यात ती झाडे वाहून गेली. गोदाघाट व रिलायन्स जिओच्या माध्यमातून सावरकर नगर येथे गोदापार्क उभारण्यात आले होते.

दोन वर्षांपुर्वी झालेल्या पावसात गोदापार्क वाहून गेला होता. गोदाकाठी पावसाळ्यात होणारे नुकसानीचा अनुभव गाठीशी असताना देखील आता स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून गोदाकाठावर रामवाडी ते टाळकुटेश्‍वर पुलादरम्यान पुररेषेतचं आठशे झाडांची लागवड केली जाणार असल्याने स्मार्ट सिटी कंपनीचा निर्णय वादग्रस्त ठरणार आहे. 
 
Web Title: marathi news smart city company decision