स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची १७ जुलैला बैठक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

नाशिक- स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीची गेल्या महिन्यात रद्द करण्यात आलेली बैठक येत्या 17 जुलैला होणार आहे. जून महिन्यातील बैठकीत स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकार प्रकाश थविल यांच्यावर आरोप करण्यात आले होते.

283 कोटींच्या स्काडा योजनेच्या निविदा प्रक्रियेतील फेरबदल, स्मार्ट रोड कामाची वाढलेली किंमत, संचालकांना विश्‍वासात न घेता कंपनीत झालेली अधिकारी भरती, महात्मा फुले कलादालनाचे काम पुर्ण होवूनही ठेकेदाराला अधिक मोबदला देणे या महत्वाच्या विषयांवर संशय व्यक्त करण्यात आल्याने बैठक रद्द करण्यात आली होती. बैठक सुरु होण्यापुर्वी आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, कॉंग्रेस गटनेते शाहु खैरे, गुरमित बग्गा यांनी अध्यक्ष कुंटे यांची भेट घेवून थविल यांची बदली करण्याची मागणी केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news smart city meeting