स्मार्ट कंपनीच्या बैठकीवर विरोधकांचे "बहिष्कारास्त्र' निष्प्रभ,अध्यक्षांकडून कामाची पाठराखण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

नाशिक- केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्वकांक्षी प्रकल्पांत गैरव्यवहार होत असल्याचा विरोधकांनी केलेला आरोप, त्यातून उपसण्यात आलेले बैठकीवरचे बहिष्कारास्त्र, कंपनीचे अध्यक्ष सिताराम कुंटे निष्प्रभ ठरविले.

विषय मांडण्यासाठी संचालक मंडळाचे व्यासपिठ उपलब्ध असतांना बहिष्कार टाकणे योग्य नसल्याचे सांगतं विरोधकांनी वादग्रस्त ठरविलेल्या विषयांना मंजुरी दिली. संशय व्यक्त करण्यात आलेल्या स्काडा अंतर्गत पाणी मीटर बसविण्याचा विषयाला स्थगिती देत नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या.

दरम्यान सत्ताधारी पक्षातील संचालक मंडळांनी गेल्या बैठकीत बहिष्कारास्त्र उगारले होते. स्मार्ट सिटी चा संबंध थेट मुख्यमंत्र्यांशी येत असल्याने आज महापौर, उपमहापौर व सभागृह नेत्यांनी बैठकीत सहभाग घेतल्याने लोकनियुक्त संचालकांच्या एकीत फुट पडली. 
पाण्याच्या थेंब अन थेंबाचा हिशोब लावण्यासाठी गावठाण भागात स्काडा प्रणाली अंतर्गत सुमारे पावणे दोन लाख पाणी मीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात दहा हजार मीटर बसविण्याचा निर्णय घेतल्याने यात ठेकेदार घुसविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप महापौर रंजना भानसी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, कॉंग्रेसचे शाहु खैरे, गुरुमित बग्गा व माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केला होता. 

      कुंटे यांनी संचालकांच्या मागणी नुसार बैठकचं रद्द केली. जून महिन्यातील बैठक आज झाली. मागील बैठकीप्रमाणेचं संचालकांची बैठक सुरु होण्यापुर्वी संचालकांनी कुंटे यांची स्वतंत्र भेट घेतली. परंतू बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर बोरस्ते, खैरे व बग्गा यांनी सभेवर बहिष्कार टाकला. तर महापौर, उपमहापौरांसह सभागृह नेत्यांनी कामकाजात सहभागी झाले. स्काडा प्रणाली अंतर्गत पाणी मीटर बसविण्याच्या विषय तांत्रिक स्वरुपाचा व गुंतागुंतीचा असल्याने सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना कुंटे यांनी दिल्या. 

एखाद्या विषयाबद्दल संशय किंवा चर्चा करायची असेल तर त्यासाठी संचालक मंडळाची मासिक बैठक कायदेशीर व्यासपिठ आहे. संचालकांनी बैठकीत चर्चेतून मार्ग काढता येतो.

- सिताराम कुंटे, अध्यक्ष, स्मार्ट सिटी कंपनी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news SMART CITY MEETING