स्मारिट सिटीच्या रस्त्याचे मंडपाखाली स्मार्ट काम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नाशिक- स्मार्ट सिटी कंपनी मार्फत सुरु असलेल्या स्मार्ट रस्त्याच्या कामावरून नगरसेवकांसह नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असल्याने आता कंपनीकडून घाईघाईने काम उरकले जात असून रस्ता पुर्ण करण्यासाठी पावसामुळे ज्या भागाचे काम सुरू आहे त्या जागेवर मंडप टाकण्यात आला आहे. काम जलदगतीने आटोपण्यासाठीचा उपाय असला तरी यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्‍न मात्र उपस्थित होणार आहे. 

अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान 1.1 किलोमीटर या एका बाजुचे काम पुर्ण करण्यात आले आहे. सध्या दुसऱ्या 1.1 किलोमीटर लांबीचे काम सुरु आहे. ऑक्‍टोंबर 2018 मध्ये काम पुर्ण करण्याची मुदत होती. त्यानंतर डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्या कालावधीत देखील रस्त्याचे काम न झाल्याने पुन्हा जानेवारी 2019 पर्यंत मुदत देण्यात आली. तरीही ठेकेदाराकडून रस्ता तयार होत नसल्याने 31 मार्च डेडलाईन देण्यात आली. त्यानंतर मात्र दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली. स्मार्ट सिटी कंपनीकडून दररोज 36 हजार रुपये दंड आकारला जात असला तरी त्याबाबतची कागदपत्रे मात्र उपलब्ध नाहीत. गेल्या महिन्यात स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 31 ऑगष्ट हि अंतिम मुदत जाहीर करण्यात आली. 

गुणवत्तेवर संशय 
जुलैच्या मध्यापासून पाऊस सुरु असल्याने आतापर्यंत पुर्णपणे उघडला नाही. सिमेंट कॉन्क्रीटचे काम करतं असताना पावसाच्या पाण्यामुळे पाणी मिश्रीत सिमेंट वाहुन जाण्याची भिती असल्याने मंडप टाकण्यात आला असल्याचा दावा केला जात असला तरी घाईघाईने उरकले जाणाऱ्या कामामुळे रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. यापुर्वी पाण्याचे पाईपलाईन असो कि विविध प्रकारच्या वायरींग साठी टाकण्यात आलेले डक्‍ट च्या कामाच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त करण्यात आला. त्यासाठी आंदोलने देखील झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news smart city orad