कर्तव्य बजावतांना अंगावर वीज पडून जवान शहिद

residentional photo
residentional photo

मनमाड- गुजराथच्या जामनगर येथे जवान मल्हारी खंडू लहिरे  यांना  शुक्रवारी दुपारी एडीआरटीच्या युनिटमध्ये शस्त्रगाराची सुरक्षा करत देशसेवेचे कर्तव्य बजावीत असतांना अंगावर वीज पडून वीरगती प्राप्त झाली. त्यांचे पार्थिव आज (ता ७) रात्री क-ही या त्यांच्या गावी आणण्यात येणार आहे. शहीद जवान मल्हारी लहिरे 
यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी (ता ८) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जवान मल्हारी लहिरे यांच्या निधनाने नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सन २०१२ साली सैन्य दलात मुंबई येथे भरती झालेले जवान मल्हारी लहीरे यांनी छत्तीसगड, राजस्थान, जम्मू-काश्मीर आदी भागात आपले कर्तव्य बजावले होते. सध्या ते गुजराथ राज्यातील जामनगर येथे विमान हल्ला प्रतिरोधक बटालियनमध्ये कार्यरत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com