जवानाचे औदार्य मोठे....शेतमजूराच्या उपचारासाठी पुढे आला

residentional photo
residentional photo


सोयगाव : सीमेवरही त्यांनीच रक्षण करावे आणि गावाकडे आल्यावर पुन्हा माणुसकीचा धर्म बजावावा अशी दुहेरी भूमिका सुटीवर आलेल्या जवानांनी बजावत माणुसकीचा नवा आदर्श समाजासमोर मांडला. पायाच्या भयंकर व्याधीने जर्जर असलेल्या एका शेतमजुराच्या मुलावर तातडीच्या उपचारासाठी मदत करून जवानांनी स्वखर्चातून त्याला जीवदान दिले. 

तालुक्‍यातील लेंडाणे येथील पितृछत्र हरपलेल्या भाऊसाहेब काशीनाथ माळी (वय 34) हा शेतमजूर गेल्या अनेक दिवसांपासून पायाच्या गंभीर दुखापतीमुळे त्रस्त होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तो वेदनेच्या मरणयातना भोगत होता. सुटीत आलेल्या गावातील जवानांनी त्याला मदतीचे दाखविलेले औदार्य मरणाच्या दारातून पुन्हा बाहेर घेऊन आले. 
अरुणाचलला देशसेवा बजावणारे जवान रामचंद्र आहिरे सुटीवर लेंडाणेला आले.

जीव वाचवला

गावातील तरुणांकडून भाऊसाहेबच्या पायाच्या आजारासंदर्भात कळताच त्यांनी तातडीने त्याचे घर गाठत गावात सुटीवर आलेल्या जवानांना आणि ज्येष्ठांना सांगून भाऊसाहेबवर स्वखर्चातून उपचार करण्याचे ठरविले. डॉ. तुषार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नाशिकला उपचारासाठी दाखल करण्यात आले. पायाच्या तीव्र दुखण्यामुळे भाऊसाहेबला जीव गमवावा लागणार होता मात्र पाय काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. जानेवारीत त्याला कृत्रिम फुटवेअर बसविताच तो स्वतःच्या पायावर उभा राहील. 

रामचंद्र अहिरे, साहेबराव अहिरे, अनिल अहिरे, नानू रावले, सोपान रावले, सुनील जगताप, समाधान जगताप, शरद सोनवणे, सखाराम सोनवणे, काशीनाथ देवरे, गणेश सोनवणे या जवानांनी आधार दिला. पोलिसपाटील अशोक सोनवणे, दादाजी अहिरे, अर्जुन अहिरे, सचिन सोनवणे, जगन्नाथ अहिरे, बोरसे मंडळी, हरचंद माळी, काळू अहिरे, पप्पू अहिरे, राहुल अहिरे, आबा अहिरे, नितीन अहिरे, रवी अहिरे, उपसरपंच बुधा सोनवणे, विजय जगताप, पोपट अहिरे, भाऊसाहेब जगताप, मच्छिंद्र जगताप यांनी यासाठी पुढाकार घेतला. 


पायाच्या दुखापतीने त्रस्त होतो. पैशांअभावी उपचार शक्‍य नव्हते. गावातील सैन्यदलातील जवानांनी व वरिष्ठांच्या मदतीने आज मी मरणाच्या दारातून परतलो आहे. सर्वांचा मी आभारी आहे. 
-भाऊसाहेब माळी  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com