धुळे जिल्ह्यात उपयुक्त जलसाठा ४१.२२ टक्‍केच; १०२ गावांना टंचाईची शक्‍यता 

धुळे जिल्ह्यात उपयुक्त जलसाठा ४१.२२ टक्‍केच; १०२ गावांना टंचाईची शक्‍यता 


सोनगीर ः ः एप्रिलमध्येच ३९ अंश सेल्सिअस तापमान झाले असून गेल्यावर्षीच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाई नाही. मात्र जिल्ह्यात लघू व मध्यम प्रकल्पात पाण्याचा उपयुक्तसाठा अवघा ४१.२२ टक्के असल्याने नियोजन करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी एप्रिल व मे मध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. गेल्यावर्षी याच दिवशी ४३. ६३ टक्के जलसाठा होता. त्यामानाने यंदाची ही स्थिती फारशी चांगली म्हणता येणार नाही. गेल्या वर्षी पाणीटंचाई जाणवली नाही. यंदा १०२ गावांना पाणीटंचाईची शक्यता आहे. 

जिल्ह्यात लघू व मध्यम प्रकल्पात सध्या २०३.९८ दशलक्ष घनमीटर एवढा जलसाठा आहे. नंदूरबार येथील लघु व मध्यम प्रकल्पात १४३. ०३ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४९.४० इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. धुळे जिल्ह्यात १२ मध्यम व ४७ लघुप्रकल्प आहेत. प्रकल्पांची क्षमता ४९४. ८६ दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे. लघुप्रकल्पांची जलसंचयन क्षमता १२१.९७ दशलक्षघनमीटर एवढी असताना अवघा ३५.८३ दशलक्षघनमीटर म्हणजे २९.३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे अजूनही पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. 

मध्यम प्रकल्पाची जलसंचयन क्षमता ४७१. ४३ दशलक्ष घनमीटर असून सध्या १६८.१६ दसलक्षघनमीटर म्हणजेच ४५. १० टक्के जलसाठा आहे. धुळे जिल्ह्यातील १२ प्रकल्पांपैकी सर्वांत जास्त ३२.७४ दलघमी जलसाठा अनेर प्रकल्पात आहे. तर सर्वांत कमी १.०६ दशलक्षघनमीटर जलसाठा कनोली प्रकल्पात आहे. बहुतांश लघुप्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे. ४७ लघुप्रकल्पांपैकी ३६ लघुप्रकल्पात कमी जलसाठा असून ११ प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी आहे. परिसरातील जामफळ, सोनवद, देवभाने, सातपायरी धरणात अत्यल्प साठा आहे. यंदाच्या या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यास प्रकल्प भरतील व शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील. कोरोना, वादळाने त्रस्त जनतेला अद्याप पाणी टंचाईने ग्रासले नाही हे भाग्यच म्हणावे लागेल. 

असा आहे प्रकल्पनिहाय जलसाठा (आकडेवारी दलघमीमध्ये ) 
प्रकल्प जलसाठा टक्केवारी 

१) पांझरा - १५.६३ ४४ 
२) मालनगाव - ५.४९ ४८ 
३) जामखेडी - ५.८९ ४८ 
४) कनोली - १.०६ १३ 
५) बुराई - ६. ०० ४२ 
६) करवंद - ७. २८ ४० 
७) अनेर - ३२.७४ ६६ 
८) सोनवद - १.८७ १३ 
९) अमरावती ९.५१ ४५ 
१०) अक्कलपाडा - २६.७५ ३० 
११) वाडीशेवाडी - २०.५९ ६१ 
१२) सुलवाडे - ३५.३५ ५४ 
एकूण मध्यम प्रकल्पात - १६८.१६ ४५ 
एकूण लघु प्रकल्पात - ३५.८२ २९ 
एकूण जलसाठा. २०३. ९९. ४१ 
……………………………………. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com