चिमण्यांनो ! परत फिरा रे...घराकडे आपुल्या !! 

आनंद बोरा
सोमवार, 19 मार्च 2018

नाशिकः या...चिमण्यांनो ! परत फिरा रे...घराकडे आपुल्या...ग. दि. माडगूळकरांचे हे गाणे आपणाला बरेच काही सांगून जाते. मानवाला निसर्गाची ओळख करुन दिली आहे. ती म्हणजे, चिमणीने. प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेली. पण कॉंक्रीटीकरणाच्या जगतात चिमणी दिसेनाशी झाली. अशा एका वातावरणात पवननगरच्या के. बी. एच. विद्यालयातील कलाशिक्षक संजय जगताप यांनी चित्रकलेल्या समर्थ माध्यमातून चिमणी संवर्धनाच्या जागृतीचा उपक्रम हाती घेतला. 

श्री. जगताप यांनी चिमण्यांची विविध रुपे ऍक्रेलिक रंगामध्ये रंगवली आहेत. ते आता शाळांमध्ये जाऊन चिमण्यांची माहिती विद्यार्थ्यांना देतील. त्यासंबंधीची सुरवात त्यांनी आपल्या शाळेपासून केली आहे. चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयीच्या जागृतीसाठी 20 मार्च हा "जागतिक चिमणी दिन' साजरा केला जातोय. त्याची सुरवात 20 मार्च 2010 ला नाशिकचे दिलावर खान या पक्षीमित्राने केली. त्यांचा हा वारसा श्री. जगताप पुढे नेत आहेत. 

शहरातील जुनी वाड्यांच्या जागेवर मोठ्या इमारती उभ्या राहिल्यात. त्यासाठी डेरेदार वृक्षांची तोड झाली आहे. अंगणात धान्य निवडणाऱ्या गृहिणी देखील पाह्यला मिळत नाहीत. त्यामुळे चिमण्यांना दाणा-पाणी मिळणे मुश्‍कील बनलयं. शहरवासियांना चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळणे दुर्मीळ झाले आहे. म्हणूनच कविता, बडबडगीतापुरती चिमणी शिल्लक राहते की काय? असा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे. जागतिक चिमणी दिनानिमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत, परसात जर खाद्याची व्यवस्था केली, तर आपल्याला चिमण्या दिसू लागतील, असा विश्‍वास पक्षीमित्रांना वाटतोय. सदनिका, टेरेस, खिडकीत दाणा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले असले, तरीही त्याची चळवळ होणे पर्यावरणाच्यादृष्टीने महत्वाचे झाले आहे. रिकाम्या खोक्‍यांमधून घरटी बनवण्याबरोबर रिकाम्या बाटल्यांपासून खाद्य भरवायचे फिडर बनवता येऊ शकतात. याखेरीज चिमण्यांसाठी नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना आवडणाऱ्या बाभूळ वृक्षाची लागवड व संवर्धन करायला हवे, असेही पक्षीमित्रांचे म्हणणे आहे. बाभूळवर चिमण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बाभूळावर त्या आनंदाने वास्तव्यास असतात. ही बाब निरीक्षणातून पुढे आली आहे. 
 
Web Title: marathi news sparrow day