दहावी पुरवणी परीक्षेत विभागाचा निकाल 25 टक्‍के, नाशिक जिल्ह्याचा निच्चांकी 17.14 टक्‍के

residentional photo
residentional photo

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जुलैमध्ये घेतलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.30) जाहिर झाला. नाशिक जिल्ह्यासह धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असलेल्या नाशिक विभागाचा निकाल 25.08 टक्‍के लागला आहे. राज्यातील नऊ विभागांपैकी नाशिक विभाग पाचव्यास्थानी आहे. विभागांतर्गत नाशिक जिल्ह्याचा सर्वात कमी 17.14 टक्‍के निकाल लागला आहे. 

17 ते 30 जुलैदरम्यान दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. शुक्रवारी (ता.30) दुपारी एकला निकाल संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात जाहिर झाला. नाशिक विभागातून 25 हजार 653 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 24 हजार 311 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 6 हजार 097 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून विभागातील उत्तीर्णांचे प्रमाण 25.08 टक्‍के इतके आहे. दरम्यान परीक्षा कालावधीत जळगाव जिल्ह्यात सहा विद्यार्थी गैरमार्गाचा अवलंब करतांना आढळले होते. या विद्यार्थ्यांवर मंडळ नियमावलीनुसार शास्ती करण्यात आली आहे. जुलै- ऑगस्ट 2017 मध्ये विभागाचा निकाल 29.46 टक्‍के होता. जुलै- ऑगस्ट 2018 मध्ये विभागाचा निकाल 29.35 टक्‍के लागला होता. या वर्षी निकालात साधारणत: चार टक्‍यांची घसरण झालेली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com