पारोळ्याजवळ एसटी बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

जळगाव : धुळे ते जळगाव जाणारी विना थांबा बस पारोळ्याजवळ आली असता एका मोटारसायकलला धडक दिली. यात शेळवे येथील दोन जण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे .

धुळे ते जळगाव जाणारी विना थांबा बस सकाळी साडेनऊच्या सुमारास पारोळ्याजवळ आली असता येथील कुटिर रुग्णालयाजवळ बसने एका मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये शेलावे येथील तीन मजूर सापडले.

या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी आहे. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, परिसरातील नागरिकांनी तातडीने बसला बाजूला करून बसखली अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. अपघातात प्रवीण पाटील, दीपक सांगळे या दोघांचाही मृत्यू झाला. तर सुरेश भिल गंभीर झाले असून, त्यांना धुळे येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मोटार सायकलवरील तिघेही विहिर खोदकाम करणारे मजूर होते. 

Web Title: Marathi news ST Bus accident two person died jalgaon news