तिसऱ्या सोमवारी बस  ईदगाह मैदानावरुन सोडणार,महापालिकेची अनुकूलता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नाशिक : त्र्यंबकेश्‍वरला तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा अर्थात फेरीसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाने अतिरिक्‍त बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. मेळा बसस्थानकाच्या जागेत बसपोर्टची उभारणी सुरू असल्याने त्र्यंबकेश्‍वरसाठीच्य गाड्या त्र्यंबकरोडवरील ईदगाह मैदानावरुन सोडल्या जाणार आहेत. महापालिकेने यासंदर्भात अनुकुलता दर्शविली असून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्याची महामंडळाची लगबग सुरू आहे. 

दरवर्षी जुने सीबीएस परीसरातील मेळा बसस्थानक येथून त्र्यंबकेश्‍वरकरीता बसगाड्या सोडल्या जात असतात. त्यासाठीची विशेष व्यवस्था महामंडळातर्फे केली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मेळा बसस्थानकाच्या जागेवर एअरपोर्टच्या धर्तीवर राज्यातील सर्वात मोठे बसपोर्ट उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे मेळा बसस्थानक परीसर बस वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 

     मेळा बसस्थानक बंद असल्याने त्र्यंबकेश्‍वरकरीता नियमित गाड्या जुने सीबीएस येथून सोडल्या जात होत्या. परंतु तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता, जुने सीबीएसवरुन प्रवाशी वाहतूक करणे अशक्‍य होते. या पार्श्‍वभुमिवर नजीकच असलेले ईदगाह मैदान प्रवासी वाहतूकीसाठी मिळावे, असे महामंडळातर्फे महापालिका आयुक्‍तांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यास महापालिकेतर्फे अनुकुलता दर्शविण्यात आली आहे. 

पण पोलिसांची परवानगी घ्या 
बस वाहतूकीसाठी मैदान उपलब्ध करून देतांना महामंडळाने यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडूनही आवश्‍यक परवानगी घ्यावी, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ईदगाह मैदान येथून बसगाड्या सुटल्या पोलिसांचीही गैरसोय होणार नसल्याने पोलिस प्रशासनामार्फतही या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळणार आहे. दरम्यान ईदगाह मैदानावरुन प्रवासी वाहतूकीसंदर्भातील महामंडळाची भुमिका उद्या (ता.23) स्पष्ट केली जाणार आहे. 

अडीचशे जादा गाड्याचे 
महामंडळातर्फे नियोजन 

तिसऱ्या सोमवारसाठी शहरातील विविध भागातून भाविकांसाठी जादा बसगाड्या उपलब्ध होणार आहेत. अडीचशे गाड्यांचे नियोजन महामंडळातर्फे केले आहे. शहरासह नाशिकरोड, सातपूर, पंचवटीसह अन्य विविध भागातून या अतिरिक्‍त गाड्या सोडल्या जाणार आहेत. 

Web Title: marathi news st mahamandal