खासदारांच्या उपस्थितीत उद्या एसटीचा वर्धापन दिन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

नाशिक ः राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) 71 वा वर्धापन दिन येत्या शनिवारी (ता. 1) होत आहे. हा सोहळा नूतन खासदारांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करावा, असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत. 1 जून 1948 ला सर्वप्रथम परिवहन महामंडळाची पहिली बस नगर-पुणे मार्गावर धावली. यासाठी तो दिवस एसटी आपला वर्धापन दिन म्हणून साजरा करते. यंदाचा हा 71 वा वर्धापन दिन आहे. यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने कोठेही पाण्याचा दुरुपयोग करु नये, हार, गुच्छ, आतषबाजी करू नये, दुष्काळाची जाणिव ठेवून वर्धापन दिन साजरा करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिक ः राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) 71 वा वर्धापन दिन येत्या शनिवारी (ता. 1) होत आहे. हा सोहळा नूतन खासदारांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करावा, असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत. 1 जून 1948 ला सर्वप्रथम परिवहन महामंडळाची पहिली बस नगर-पुणे मार्गावर धावली. यासाठी तो दिवस एसटी आपला वर्धापन दिन म्हणून साजरा करते. यंदाचा हा 71 वा वर्धापन दिन आहे. यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने कोठेही पाण्याचा दुरुपयोग करु नये, हार, गुच्छ, आतषबाजी करू नये, दुष्काळाची जाणिव ठेवून वर्धापन दिन साजरा करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बसस्थानकात रांगोळ्या काढाव्या, आंब्याचे तोरण बांधा, दर्शनीभागी केळीच्या खांबाच्या स्वागत कमानी उभारा, खासदारांचा सत्कार करा, ग्रामीण भागात सरपंच, नगराध्यक्ष, साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक यांना निमंत्रित केले तरी चालणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news st vardhman