एसटी वर्धापनदिनी शहीद जवानांच्या कुटूबियांचा सन्मान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

नाशिक- एसटीचा 71वा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये थाटात साजरा करण्यात आला. या दिनानिमीत्त राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नवीन मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) आकर्षक रांगोळी काढून परिसराची सजावट करण्यात आली. विभाग नियंत्रक नितीन मैंद यांच्या हस्ते प्रवाशांना गुलाबपुष्प व पेढा देऊन स्वागत करण्यात आले. या अनपेक्षित स्वागताने प्रवाशीही अचंबित झाले. 

एसटी सेवा अखंडपणे चालू रहावी तसेच एसटीचा प्रवास सुरक्षित व संरक्षण देणारा असल्याने प्रवाशांनी एसटी प्रवासास प्राधान्य द्यावे. प्रवाशांच्या अपेक्षेनुसार एसटी चालकांनी एखाद्या प्रवाशाने हात दाखविल्यास बस थांबवावी. अशा अपेक्षा ग्राहक पंचायतीचे सुधीर काटकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. खासदारांना खास आमंत्रित करण्याचे आदेश होते. त्यानुसार निमंत्रणही देण्यात आले. पण एकही खासदार फिरकले नाही. 

नितीन मैद म्हणाले, प्रवाशी व एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे एसटीची यशस्वी वाटचाल सुरु आहे. यापुढेही प्रवाशी व कर्मचाऱ्यांचे असेच सहकार्य रहावे. राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभागात आजपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा. ही योजना नवीन सीबीएस बसस्थानक, निमाणी बसस्थानक, मालेगांव, मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगांव, इगतपुरी, लासलगांव, कळवण, पेठ, येवला, पिंपळगांव येथील बसस्थानकांवर कार्यान्वित झाली आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news st vardhpan din