भाजीपाल्याआडून विदेशी मद्याची पीकअपमधून वाहतूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नाशिक : कोबीच्या कॅरेटने भरलेल्या बोलेरो पीकअप वाहतातून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे विदेशी मद्याची वाहतूक केली जात असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अंबोली फाटा येथे सदरचे वाहन जप्त केले. दोघा संशयितांना अटक केली असून बोलेरो पीकअप वाहन हे नवीनच असल्याने ते पासिंगही झालेले नाही. त्र्यंबकेश्‍वर-जव्हार मार्गावर सदरची कारवाई करण्यात आली आहे. 

 उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, जिल्हा अधीक्षक सी.बी. राजपूत यांना वाहनातून चोरट्या पद्धतीने परराज्यातून विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, 31 डिसेंबरच्या पार्शवभूमीवर आधीच, विभागाने जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली असून भरारी पथकान्वये करडी नजरही ठेवली जात आहे
 
Web Title: marathi news state excise function