ऐका हो ऐका....उद्यापासून हौशी मराठी नाट्य स्पर्धा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

नाशिकः सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 59 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उद्यापासून (ता. 15) नाशिकमध्ये सुरवात होईल. 1 डिसेंबरपर्यंत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात 19 नाटके सादर होतील. 
उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्य सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडावा, नाट्यकलेचा प्रचार व्हावा, सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा होते. नाटकांचा आस्वाद घेण्याबरोबर कलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी रसिकांनी उपस्थित रहावे, असे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी म्हटले आहे. 
... 

प्राथमिक फेरीत सादर होणारी नाटके 
(कंसात सहभागी संस्थेचे नाव) 
-उद्या (ता. 15) सायंकाळी सात ः ड्रीम युनिव्हर्स (विजय नाट्यमंडळ) 0 24 नोव्हेंबर दुपारी साडेबारा ः आम्ही नाटक करतो म्हणजे (के. टी. एच. एम.) 
- शनिवार (ता. 16) सायंकाळी सात ः अरे देवा (संवर्धन बहुविकास संस्था) -24 नोव्हेंबर सायंकाळी सात ः प्रार्थनासूक्त (एचएडब्ल्यूआरसी रंगशाखा, ओझर) 
- रविवार (ता. 17) सायंकाळी सात ः वारुळ (आर. एम. ग्रुप) 0 25 नोव्हेंबर सायंकाळी सात ः प्रेमा तुझा रंग कसा (दिव्य फाऊंडेशन) 
- सोमवार (ता. 18) सायंकाळी सात ः साधे आहे इतकेच (नाट्यसेवा थिएटर्स) 0 26 नोव्हेंबर सायंकाळी सात ः अंधायुग (दीपक मंडळ) 
- मंगळवार (ता. 19) सायंकाळी सात ः नजरकैद (नम्रता कलाविष्कार) 0 -27 नोव्हेंबर सायंकाळी सात ः कहानी में ट्‌वीस्ट (क्राईम प्रिव्हेन्शन कॉन्सील) 
- बुधवार (ता. 20) सायंकाळी सात ः भोवरा (मेडीकल प्रॅक्‍टीशनर्स) 0 28 नोव्हेंबर सायंकाळी सात ः मजार (बॉश फाईन आर्टस्‌) 
- गुरुवार (ता. 21) सायंकाळी सात ः जनकसुता (रंगकर्मी थिएटर्स) 0 29 नोव्हेंबर सायंकाळी सात ः अरण्य (बाबाज्‌ थिएटर्स) 
- शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी सात ः दुसरे प्रेम (महात्मा फुले अकादमी 0 - नोव्हेंबर सायंकाळी सात ः द लास्ट व्हॉईसरॉय (अथर्व अकादमी) 
- शनिवारी (ता. 23) सायंकाळी सात ः काठपदर (कृतीशील निवृत्त संस्था) - 1 डिसेंबर दुपारी साडेबारा ः ओसपणाच्या कोसकोस (अश्‍वमेध थिएटर्स) 
- 1 डिसेंबर सायंकाळी सात ः चाफा (अंबिका चौक संस्था) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news state Marathi play