राज्य नाट्य स्पर्धेत नाशिकचा डंका...द लास्ट व्हाईसरॉय'ने मारली बाजी  "प्रार्थनासुक्त' द्वितीय

residentional photo
residentional photo

नाशिक ः सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या 59 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अथर्व ड्रॅमॅस्टिक ऍकॅडमीतर्फे सादर झालेल्या "द लास्ट व्हाईसरॉय' नाटकाने प्रथम क्रमांक मिळवत राज्य नाट्य स्पर्धेत आपली मोहोर उमटवली. एच. ए. ई. डब्ल्यू, आर. सी. रंगशाखा, ओझर यांच्यातर्फे सादर झालेल्या "प्रार्थनासुक्त' नाटकाने द्वितीय क्रमांक मिळवला. दोन्ही नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. नाट्यसेवा थिएटर्स यांच्यातर्फे सादर झालेल्या "साधे आहे इतकेच' नाटकाने तृतीय क्रमांक मिळवला. 

परशुराम सायखेडकर नाट्यगृहात 15 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान या स्पर्धेत नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाम अथटराव, संदीप देशपांडे आणि किर्ती मानेगावकर यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे या स्पर्धेत सांघिक, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा, अभिनय रौप्यपदक अशी सर्वच पारितोषिके "द लास्ट व्हाईसरॉय' या नाटकाने पटकावली आहे. 
........ 
स्पर्धेतील इतर पारितोषिके अशी--- : 

पारितोषिके ----------- प्रथम --------------द्वितीय 
दिग्दर्शन ---------------------------महेश डोकफोडे (द लास्ट व्हाईसरॉय) ------------- हेमंत सराफ (प्रार्थनासुक्त) 
प्रकाशयोजना ----------------------कृतार्थ कन्सारा (द लास्ट व्हाईसरॉय)----------------आकाश पाठक (प्रार्थनासुक्त) 
नेपथ्य ---------------------------- मंगेश परमार (द लास्ट व्हाईसरॉय) ---------------- गणेश सोनवणे (काठपदर) 
रंगभूषा --------------------------- माणिक कानडे (द लास्ट व्हाईसरॉय) --------------- सुरेश भोईर (ड्रीम युनिवर्स) 

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ः अक्षय मुडावदकर, पूनम पाटील (द लास्ट व्हाईसरॉय) 
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे ः पूनम देशमुख (साधे आहे इतकेच), डॉ. प्राजक्ता भांबारे (भोवरा), मनीषा शिरसाट (काठपदर), भावना कुलकर्णी (प्रेमा तुझा रंग कसा), पल्लवी ओढेकर (कहानी मे ट्‌विस्ट), समाधान मुर्तडक (अरे देवा), संदेश सावंत (प्रार्थनासुक्त), विक्रम गवांदे (वारूळ), आदित्य भोम्बे (साधे आहे इतकेच), कुंतक गायधनी (अंधायुग). 

असे विषय सादर करताना जबाबदारी मोठी असते. नाटक लिहिण्यासाठी साडेतीन वर्षे लागली तसेच 13 पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला. नाटकातील महान व्यक्तीरेखा साकारताना त्यातून कोणताही चुकीचा अर्थ जाणार नाही, याची काळजी घेतली. सहा महिने नाटकाची तालीम केली. सर्वच कलाकारांनी आपले काम चोख बजावल्याने आजचे यश मिळाले आहे. 
- महेश डोकफोडे, दिग्दर्शक (द लास्ट व्हाईसरॉय) 

एचएएलमध्ये काम करत असताना एखादा प्रोजेक्‍ट जसा पुढे नेला जातो, तसेच आम्ही हे नाटक सुद्धा अगदी बारकाईने नियोजन आणि तयारी करून सादर केले. अहिंसा म्हणजे काय? याचा शोध घेण्याचा प्रयत्न नाटकातून केला होता. मिलिंद मेधणे, संदेश सावंत यांच्यासह सर्वच टिमने शंभर टक्के योगदान दिल्याने यशाला गवसणी घालता आली. 
- हेमंत सराफ, दिग्दर्शक (प्रार्थनासुक्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com