शहरात अकरावीच्या 27 हजार जागा, पॉलिटेक्निक प्रवेश क्षमता 11 हजार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

नाशिक : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील शिक्षणाच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. शहरातील 56 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक शिक्षणक्रम अशा सर्व मिळून 27 हजार जागा उपलब्ध आहेत. दरम्यान 21 हजार 724 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्जाचा भाग एक भरला आहे. दहावीनंतर तंत्रशिक्षणाचा पर्याय असलेल्या पदविका (डिप्लोमा) करीता 27 तंत्रनिकेतनमध्ये 11 हजार 280 जागा उपलब्ध आहेत. 

गेल्या वर्षीपासून अकरावी प्रवेशासाठी महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यंदा छावनी परीषदेचा भाग वघळता शहराच्या हद्दीत असलेल्या उर्वरित सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनालाईन स्वरूपात प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. शहरात 56 कनिष्ठ महाविद्यालये कार्यरत असून त्यात सर्व शाखांच्या मिळून 27 हजार जागा उपलब्ध आहेत. सद्य स्थितीत शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याअंतर्गत आतापर्यंत 21 हजार 724 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरला आहे. महाविद्यालय पसंतीक्रम, शाखा निवडीवर आधारीत अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. 

3885 विद्यार्थ्यांची 
पडताळणीची प्रक्रिया अपूर्ण
 
अकरावी प्रवेशासाठी ऑनालाईन स्वरूपात सादर केलेल्या 21 हजार 724 विद्यार्थ्यांपैकी 15 हजार 736 विद्यार्थ्यांनी अर्जासाठीची आवश्‍यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर 2 हजार 103 विद्यार्थ्यांची संगणकीकृत पद्धतीने पडताळणी (ऑटो-व्हेरीफाईड) प्रक्रिया झालेली आहे. उर्वरित 3 हजार 885 विद्यार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार नाही. 

शहरातील प्रमुख महाविद्यालयांतील शाखानिहाय प्रवेश क्षमता- 
(अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंसर्थसहाय्य तसेच विविध माध्यमाच्या मिळून) 
महाविद्यालयाचे नाव प्रवेश क्षमता 
विज्ञान वाणिज्य कला 
नाशिकरोड बिटको 600 480 240 
भोसला महाविद्यालय 360 240 240 
सीएमसीएस 240 120 -- 
जी डी सावंत 360 120 120 
बीवायके -- 960 -- 
आरवायके 840 360 
केएसकेडब्ल्यू सिडको 480 480 240 
केटीएचएम 1560 1200 720 
व्ही. एन. नाईक 480 360 120 
पंचवटी महाविद्यालय 480 240 360 
एसएमआरके 120 120 120 

पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाची नाशिक विभागाची स्थिती 
जिल्हा तंत्रनिकेतन उपलब्ध जागा 
नाशिक 27 11,280 
नगर 27 9,685 
धुळे 10 3,080 
जळगाव 22 6,685 
नंदुरबार 03 900 
एकूण 89 31,630 

Web Title: marathi news std 11 admission