रस्त्यावरील मोकाट जनावरे होणार जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नाशिक - रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीला खोळंबा करण्याबरोबरचं शहराच्या बकालपणाला कारणीभुत ठरणारी मोकाट जनावरे आता थेट जप्त करून लिलावाद्वारे ती विक्रीला काढण्याचा निर्णय महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने घेतला आहे. स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. 

नाशिक - रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीला खोळंबा करण्याबरोबरचं शहराच्या बकालपणाला कारणीभुत ठरणारी मोकाट जनावरे आता थेट जप्त करून लिलावाद्वारे ती विक्रीला काढण्याचा निर्णय महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने घेतला आहे. स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. 

शहर कॉन्क्रीटच्या जंगलांनी वेढले जात असल्याने जनावरांना चरण्यासाठी कुरण उपलब्ध नाही, चारा महाग झाल्याने जनावरे पाळणे मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे शहरी भागातील गाय, बैल, म्हशी पाळणाऱ्या मालकांकडून जनावरे मोकाट सोडून दिली जातात. शहराच्या चौकाचौकांमध्ये नागरिकांकडून टाकलेले शिळे अन्न, कचरा कुंडीवरील कचऱ्यातून जनावरांचा उदरनिर्वाह होत असला तरी जनावरे थेट रस्त्यावर ठाण मांडतं असल्याचे दिसते.

विशेष करून सारडा सर्कल, गंजमाळ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा या शहराच्या प्रमुख भागांमध्ये भररस्त्यात जनावरे ठाण मांडतं असल्याने वाहतुकीला अडथळा तर होतोच शिवाय त्या जनावरांना देखील ईजा होते. मोकाट जनावरांमार्फत रस्त्यावरचं मलमुत्र व विष्टा केली जात असल्याने आरोग्या बरोबरचं शहराला बकालपणा आल्याचे दिसते. 

प्रशिक्षणाअभावी प्रयोग फसला 
यापुर्वी महापालिकेने जनावरे पकडून पालिकेच्या एकमेव पंचवटी विभागातील कोंडवाड्यात टाकण्याचा प्रयोग केला होता. पण पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जनावरे पकडता येत नसल्याने तो प्रयोग फसला. त्यानंतर ठेकेदारामार्फत जनावरे उचलली गेली. जनावरे पकडण्याचा खर्च व ईजा होत असल्याने ठेकेदाराने पाठ फिरवली. त्याशिवाय कोंडवाड्यात जनावरे जमा केल्यानंतर मालकांकडून लवकर ती ताब्यात घेतली जात नसल्याने पालिकेला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याची उदाहरणे लक्षात घेऊन आता पालिकेने तीन ते पाच वर्षासाठी जनावरे पकडण्याचे कंत्राट देण्याबरोबरचं ती जनावरे कायम स्वरुपी जप्त करून लिलावाद्वारे खर्च वसुल करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

Web Title: marathi news street animals