रस्तालुट करणाऱ्या दोघा दरोडेखोरांना औरंगाबादेतून अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नाशिक : नांदगाव-मालेगाव रस्त्यावर मालट्रक अडवून लुटमार केल्याप्रकरणी नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने एका अल्पवयीन संशयितांसह दोघांना औरंगाबादेतून अटक केली. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व लुटमार केलेली रक्कम असा 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे. 

नाशिक : नांदगाव-मालेगाव रस्त्यावर मालट्रक अडवून लुटमार केल्याप्रकरणी नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने एका अल्पवयीन संशयितांसह दोघांना औरंगाबादेतून अटक केली. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व लुटमार केलेली रक्कम असा 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांकडून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे. 

    नांदगाव-मालेगाव रस्त्यावरील मेहुणे शिवारात गेल्या 29 मेच्या मध्यरात्री ट्रकचालकाला लुटल्याचा प्रकार घडला होता. औरंगाबाद येथून ट्रकचालक कल्याण बडोगे हा ट्रकमध्ये (एमएच 16 एई 1852) तांदूळ घेऊन मालेगाव येथे पोहोच करण्यासाठी निघाला होता. मेहुणे शिवारात रिक्षातून आलेल्या चार-पाच संशयितांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ट्रकचालकाच्या केबिनमध्ये घुसून चालक व क्‍लिनरला चाकूचा धाक दाखविला आणि त्यांच्याकडील रोकड व मोबाईल फोन असा 19 हजार 700 रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता.

मालेगाव तालुका पोलिसात याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व त्यांचे पथक महामार्गासह मालेगाव परिसरातील रस्त्यावर संशयितांचा माग काढत असताना, दरोडा टाकणारे व गुन्ह्यातील रिक्षा औरंगाबादची असल्याची समोर आले. 
 

  गेल्या चार-पाच दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक औरंगाबादमध्ये तळ ठोकून असताना औरंगाबादच्या नारेगाव परिसरातून कलीम शब्बीर शहा (21, रा. नारेगाव, जि. औरंगाबाद), शेख अरबाज शेख नब्बु (20, रा. सहारा पॉईंट, औरंगाबाद) यांना सापळा रचून अटक केली. दोघांनी एका अल्पवयीन संशयिताच्या मदतीने सदरील ट्रक लुटला होता. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली अल्फा कंपनीची रिक्षा (एमएच 20 बीटी 9342) आणि मोबाईल असा 1 लाख 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयित हे मालेगावमध्ये नातलगांकडे आले असता, परत औरंगाबादला जात असताना त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी सहाय्यक निरीक्षक आशिष अडसुळ, संदीप दुनगहू, उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, सुनील आहिरे, वसंत महाले, दीपक आहिरे, राजू मोरे, सुहास छत्रे, पुंडलिक राऊत, राकेश उबाळे, अमोल घुगे, रतिलाल वाघ, फिरोज पठाण, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, राजू वायकंडे यांच्या पथकाने बजावली. 

Web Title: marathi news street loot