बॅंकेच्या तपशीलाअभावी रखडला विद्यार्थाचा परतावा 

अरूण मलानी
सोमवार, 19 मार्च 2018

नाशिक : शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये सीईटी परीक्षा व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेतल्यानंतर विहित मुदतीत प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांकडून प्राप्त प्रवेश निश्‍चिती शुल्काची रक्‍कम परत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रक्रिया शुल्क वजा करून विद्यार्थ्यांना शुल्क अदा केले जात आहे. राज्यातील 3 हजार 831 विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याचे तपशील नसल्याने शुल्क अदा होऊ शकलेले नाही. ही एकूण रक्‍कम 1 कोटी 28 लाख 55 हजार रूपये इतकी आहे. बॅंकेचे पुरावा सादर करण्याची अंतीम मुदत 31 मार्चपर्यंत आहे. 

2017-18 या शैक्षणिक वर्षात सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आपले प्रवेश रद्द करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यासाठी अटी व शर्ती निश्‍चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विहीत मुदतीत प्रवेश रद्द करणारे एकूण 16 हजार 985 विद्यार्थी परतावा मिळविण्यास पात्र ठरले होते. त्यापैकी बॅंकांचा तपशील उपलब्ध असलेल्या 13 हजार 154 विद्यार्थ्यांना शुल्क अदा करण्यात आले आहे. मात्र उर्वरित 3 हजार 154 विद्यार्थ्यांचा बॅंकेचा तपशील उपलब्ध नसल्याने त्यांचा शुल्काचा परतावा रखडलेला आहे. प्रक्रिया शुल्क वजा करून प्रति विद्यार्थी 4 हजार रूपये या प्रमाणे 1 कोटी 28 लाख 55 हजार रूपये इतकी रक्‍कम अद्याप अदा करण्यात आलेली नाही. 

दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांना mahacetrefund17@gmail.com या ई-मेलवर विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याचे तपशील आवश्‍यक पुराव्यांसह 31 मार्चपूर्वी पाठविणे बंधनकारक आहे. या मुदतीनंतर कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या बॅंक तपशीलाचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सदरची रक्‍कम सीईटी कक्षाकडे जप्त करण्याबाबत प्रवेश नियामक समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाईल, असे नमुद केले आहे. शुल्क मिळविण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. 
 
Web Title: marathi news student refund dalay