रखडलेल्या कामांना गती देण्याची भुजबळांची मागणी,भुजबळांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

नाशिक ः जिल्हाधिकारी स्तरावरील रखडलेल्या कामांना गती द्यावी. अशी मागणी करीत, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या लोकप्रतिनिधी कॉग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची भेट घेतली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी नउला श्री भुजबळ आमदार नरहरी झिरवाळ, दिपिका चव्हाण, पंकज भुजबळ, डॉ.सुधीर तांबे, माजी खासदार देविदास पिंगळे, समीर भुजबळ, माजी आमदार दिलीप बनकर, शिरीष कोतवाल, जयंत जाधव, श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, रंजन ठाकरे, भारती पवार, निवृत्ती अरिंगळे, प्रेरणा बलकवडे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. 

पतआराखडा घटला 
श्री भुजबळ यांनी नाशिकचा पतआराखडा राज्यात सर्वात मोठा होता. पण दोन वर्षात मोठी कात्री लागली. जिल्हा बॅकेच्या आर्थिक अडचणीमुळे पीक कर्जासाठी वणवण सुरु आहे. मांजरपाडाचे काम रखडले आहे. आभियांत्रिकी प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय गंभीर आहे. पाणी टॅकर मंजूरीचे प्रस्ताव अडविले जातात. येवला- दिंडोरी-सटाणा-चांदवड भागातील अनेक कामे रखडली असल्याचे सांगत त्यात लक्ष घालण्याची मागणी केली. मांजरपाडा वळण योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करावे. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा प्रवाहीत व्हावा.ममदापूर महालखेडा, देवना,सावरगाव साठवण तलावाचे काम प्रलंबित आहेत. लासलगाव-विंचूर राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे ÷÷उड्डाणपूलासाठी भूसंपादन आदी विषयाचे निवेदन दिले. 

लवकरच बैठक 
जिल्हाधिकाऱ्यांनी, राष्ट्रीयकृत बॅकांमध्ये शेतकरी कर्जाची सोय केली आहे. दाखल्याबाबत त्वरीत सूचना करण्यासह विविध विषय मार्गी लावण्यासाठी लवकरच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसोबत एकत्रित बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. 

-रखडलेल्या मांजरपाडा प्रकल्पाला गती द्यावी 
-मे पासून नांदगावला टॅकरचे प्रस्ताव प्रलंबित 
-अघोषीत भारनियमनाप त्वरीत बंद केले जावे 
-खरीपाला खत,बियाणांचा सुरळित पुरवठा करा 
-प्रलंबित वनहक्क दावे त्वरीत निकाली काढा 

Web Title: marathi news subhash bhamre chagan bhujbal

टॅग्स