"मालेगाव मध्य'चा समावेश रेड झोनमध्ये करा : डॉ. सुभाष भामरे  

subhash bhamre
subhash bhamre

धुळे : "कोरोना'च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर "मालेगाव मध्य'चा रेड झोनमध्ये समावेश करावा, किमान दोन आठवड्यांसाठी सील करावा. तसेच मालेगावमधील सार्वजनिक रुग्णालयात 500 पीपीई कीट व 20 व्हेंटिलेटरची सोय करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 
मालेगाव मध्य धुळे लोकसभा मतदारसंघातील क्षेत्र आहे. गेल्या दीड महिन्यापासून राज्य सरकार "कोरोना'च्या विरोधात लढा देत आहे; परंतु काही ठिकाणी "कोरोना'चे गांभीर्य नाही. त्यापैकीच मालेगाव मध्य आहे. दिल्लीतील तबलिक जमातचे मरकजमध्ये जे अधिवेशन झाले. त्यात किमान 100 हून अधिक मालेगाव मध्यचे रहिवासी सामील असावेत, असा अंदाज आहे. परंतु त्यांनी सहकार्य न केल्यामुळे आज मालेगाव मध्य हॉट स्पॉट झाला आहे. 
दोन दिवसात मालेगावचे 30 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. तसेच 155 जणांचे शरीरातील नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. त्यांचे रिपोर्ट उद्यापर्यंत अपेक्षित आहेत. त्यातील अनेक पॉझिटिव्ह येऊ शकतात. "मालेगाव मध्य'मध्ये लोकांना याचे गांभीर्य नाही. स्थानिक नागरिक पोलिस किंवा पालिका प्रशासनाला सहकार्य करीत नाहीत. मालेगाव मध्य सील केले नाही, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला धोका आहे. मालेगावचा समावेश "रेड झोन'मध्ये व्हावा, मालेगाव मध्य किमान दोन आठवड्यांसाठी सील करण्यात यावे. मालेगावमधील सार्वजनिक रुग्णालयात 500 पीपीई कीट व 20 व्हेंटिलेटरची सोय करावी, अशी मागणी डॉ. भामरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com