नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

वणी : कोल्हेर, ता. दिंडोरी येथे माहेरी  रक्षाबंधनासाठी आलेल्या नवविवाहीतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

वणी : कोल्हेर, ता. दिंडोरी येथे माहेरी  रक्षाबंधनासाठी आलेल्या नवविवाहीतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

नळवाडपाडा(ता. दिंडोरी) येथील सविता रविंद्र महाले( वय २०) ही नवविवाहीता माहेरी कोल्हेर येथे १५ ऑगस्टला  रक्षाबंधनासाठी  आली होती. आज सायकांळी पाचच्या सुमारास घरातील सर्व व्यक्ती शेतात काम करत असतांना मी घरातून पाणी घेऊन येते असे सांगुन ती घरात गेली आणि राहत्या घराच्या अडगळीस नॉयलॉन दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार पंधरा वीस मिनिटांनी लक्षात आल्यानंतर कुटुंबीयानी याबाबतची माहीती पोलिस पाटील राजेंद्र गायकवाड यांना दिल्यानंतर गायकवाड याॆनी वणी पोलिसाॆत घटनेची खबर दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sucide