सुजॉय गुप्ता यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

नाशिक : सातपूर परिसरातील ध्रुवनगर येथे नव्याने उभे राहत असलेल्या सम्राट ग्रुपच्या अपना घर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दूर्घटनेत चौघांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे. येत्या 7 ऑगस्टपर्यंत त्यांना अटी-शर्थीन्वये अंतरिम जामीन मंजूर केला. नाशिक जिल्हा न्यायालयाने गुप्ता यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. 

  ध्रुवनगरमध्ये सम्राट ग्रुपच्या माध्यमामधून "अपना घर' या गृहप्रकल्पाचे काम सुरू होते. गेल्या 2 जुलै रोजी सकाळी आठ-साडे आठ वाजेच्या सुमारास मजुरांसाठी बांधण्यात आलेली 30 हजार लिटर पाण्याची टाकी फुटली होती. या दूर्घटनेमध्ये टाकीजवळ आंघोळ करणारे तीन मजूर व कपडे धुणारी महिला अशा चौघांचा ढिगाऱ्यांखाली दबून मृत्यु झाला होता.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता, ठेकेदार भाविन पटेल, आशिष सिंग, सचिन शेवडे, नारायण कडलग यांच्या विरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौघांना पोलिसांनी अटकही केली होती तर सुजॉय गुप्ता फरार झाले होते. याप्रकरणी गुप्ता यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला असता, न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. त्यामुळे गुप्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली असता, न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी, गुप्ता यांना येत्या 7 ऑगस्टपर्यंत अटी-शर्थीन्वये अंतरिम जामीन मंजूर केला आहे.बचाव पक्षातर्फे ऍड. अशोक मुंडर्गी, ऍड मनोज मोहिते, ऍड. जयदीप वैशंपायन, ऍड. रवीराज परामणे यांनी कामकाज पाहिले.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sujoy gupta