स्वच्छ भारत अभियानासाठी महापालिकेची धडपड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

नाशिक : स्वच्छ भारत अभियानामध्ये कमालीचा घसरलेला क्रमांक वर आणण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आता नवीन शक्कल लढविली आहे. ओला व सुका कचऱ्याचे विलगिकरण करण्याबरोबरचं जागेवर प्रक्रिया करण्याचे आवाहन करताना ज्या व्यक्ती किंवा संस्था जागेवर कचरा विलगिकरण व प्रक्रिया करतं असेल त्यांची माहिती पंधरा ऑगष्ट पर्यंत महापालिकेला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. वरवर पाहिले तर नाशिक शहर स्वच्छतेच्या बाबतीत राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत आघाडीवर आहे. परंतू पहिल्या वर्षी पहिल्या शंभर शहरांमधून तीसावा क्रमांक आल्यानंतर त्यापुढील वर्षी पहिल्या दहा मध्ये येण्याचे नियोजन करण्यात आले परंतू 476 शहरांमध्ये नाशिक 151 व्या क्रमांकावर फेकले गेले. यावर्षी पुन्हा पहिल्या दहा क्रमांकामध्ये समावेशासाठी धडपड करण्यात आली. खुद्द नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी देखील सुचना दिल्या . पण यावर्षात चार हजार शहरांमधून 63 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पुढील वर्षी पुन्हा एकदा स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदवावा लागणार असल्याने पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पर्धा सुरु होण्यापुर्वीचं नामी शक्कल लढवतं नागरिकांना किचन वेस्ट म्हणजेच ओला कचरा घंटागाडी मध्ये न टाकता जागेवरचं विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. जे लोक किंवा संस्था ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावतं असतील त्यांनी पंधरा ऑगष्ट पर्यंत पालिकेकडे नावे कळविण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणाची टिम शहरात दाखल झाल्यानंतर आयती प्राप्त झालेली आकडेवारी त्यांना दाखविण्यासाठी खटाटोप मांडला आहे. 
 
पाचशे ठिकाणी विलगिकरण 
स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून झालेल्या सर्वेक्षणा मध्ये शहरात पाचशे व्यक्ती, संस्थांकडून ओला कचऱ्यावर जागेवर प्रक्रिया केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मोठे गृहनिर्माण प्रकल्पांचा यात समावेश असून ओला कचऱ्याच्या माध्यमातून सेंद्रीय खत तयार करून ते झाडांना वापरले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

Web Title: marathi news swachya bharat abhiyan