सटाणा,बागलाणमध्ये नदी स्वच्छता अभियानात अनोखा उत्साह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

सटाणाः सकाळ,सटाणा नगरपरिषद,देवमामलेदार ट्रस्ट,रोटरी क्लबतर्फे आज शहरातील आरम नदीपात्र स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली. नगरपरिषद,देवमामलेदार ट्रस्ट,रोटरी क्लब,विविध सामाजिक संघटना,पक्ष व लोकसहभागातून आरमनदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सकाळ ने पुढाकार घेतला असून या कार्यात लोकसहभागही मोठ्या प्रमाणावर दिसून आला. नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनी श्रीफळ वाढवून या अभियानाचे औपचारिक उद्घाटन केले.

सटाणाः सकाळ,सटाणा नगरपरिषद,देवमामलेदार ट्रस्ट,रोटरी क्लबतर्फे आज शहरातील आरम नदीपात्र स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली. नगरपरिषद,देवमामलेदार ट्रस्ट,रोटरी क्लब,विविध सामाजिक संघटना,पक्ष व लोकसहभागातून आरमनदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सकाळ ने पुढाकार घेतला असून या कार्यात लोकसहभागही मोठ्या प्रमाणावर दिसून आला. नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनी श्रीफळ वाढवून या अभियानाचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, माजी आमदार संजय चव्हाण,उपनगराध्यक्ष संगीता देवरे, गटनेते नितीन सोनवणे, महेश देवरे, नगरसेवक दत्ता बैताडे, पुष्पा सुर्यवंशी, डॉ.विद्या सोनवणे,  रोटरी क्लबचे उमेश बिरारी,प्रदीप बच्छाव, प्रल्हाद सोनवणे, डॉ.प्रकाश जगताप,, देवमामलेदार ट्रस्टचे हेमंत सोनवणे, रमेश सोनवणे, अभिजीत बागड,बागलाणचे संचालक आनंद महाले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे,ज.ल.पाटील.किरण सोनवणे आदी उपस्थित होते. जोपर्यत आरम नदीपात्र स्वच्छ होत नाही तोपर्यत हे काम अविरत सुरु राहणार आहे. प्रत्येकाची जबबादीर असून सर्वांनी या कामात योगदान देणे गरजेचे आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. बूट,चप्पल बाजूला काढून लोकांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग द्यावा,असे मत काहींनी नोंदवले. श्री.माने यांनी या उपक्रमांगची संकल्पना विषद करत, सकाळ आपल्या साथीला असल्याचे नमूद केले.

Web Title: marathi news swachyta abhiyan