पुष्पक एक्स्प्रेसचा डबा इगतपुरी स्टेशनवर घसरला, अडीच तास खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

इगतपुरी शहर-मुंबई लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस आज  सकाळी इगतपुरी स्टेशन स्थानकावरुन आल्यानंतर नाशिकला जात असतांना या गाडीचा शेवटचा जनरल डब्बा रुळावरून घसरला. सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

इगतपुरी शहर-मुंबई लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस आज  सकाळी इगतपुरी स्टेशन स्थानकावरुन आल्यानंतर नाशिकला जात असतांना या गाडीचा शेवटचा जनरल डब्बा रुळावरून घसरला. सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. 
     मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या 12533 लखनऊ मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ही गाडी इगतपुरी स्थानकावर आली. यानंतर गाडी नाशिकला रवाना होत असतांना गाडीचा मागचा जनरल डबा दोन नंबर प्लॅटफॉर्म वरून जात असताना सकाळी 11.20 च्या सुमारास घसरला. ही बाब रेल्वे सुरक्षा बलाचे जवान किशोर बर्वे यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने धावत जाऊन गाडीतील गार्डला या बाबत कल्पना दिली. गार्डने तत्परता दाखवत त्वरीत प्रेशर डाऊन करून गाडी थांबविल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. यावेळी प्रवाशांनी स्टेशन परिसरात एकाच गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या आपतकालीन विभागाने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर डब्बा जोडण्याचे काम हाती घेण्यात आले. डबा रेल्वे रुळावर उचलुन घेतल्यावर ही ट्रेन पुढील प्रवासाठी दुपारी १.२५ वाजता रवाना करण्यात आली. रेल्वे खुरक्षा बलाचे जवान किशोर बर्वे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news tain late