esakal | तळोद्यात ऊस कामगारांचा वेतन वाढीसाठी निदर्शने !
sakal

बोलून बातमी शोधा

तळोद्यात ऊस कामगारांचा वेतन वाढीसाठी निदर्शने !

कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू कराव्यात. कामगारांना प्रॉव्हिडंंड फंड व ग्रॅच्युईटीच्या हक्क व बोनस यांची रक्कम शासनाने व कारखान्याने भरावी.

तळोद्यात ऊस कामगारांचा वेतन वाढीसाठी निदर्शने !

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा : ऊस तोडणीच्या येत्या हंगामात ऊस तोड व वाहतूक कामगारांना वाढीव वेतन देण्यात यावे व नवीन करार करावेत या प्रमुख मागणीसाठी ऊसतोडणी कामगार व वाहतूक संघटनेच्या नंदुरबार जिल्हा कमिटीच्या वतीने अयान मल्टीट्रेड अर्थात समशेरपुर साखर कारखान्यासमोर निदर्शने केले. तसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शेतकी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

वाचा- खानदेशात जिल्हा परिषदेच्या सतरा ‘मॉडेल शाळा’ 
 

ऊस तोडणी कामगार व वाहतूक संघटनेच्या वतीने समशेरपूर ता जि. नंदूरबार येथे निदर्शने करण्यात येऊन कारखान्याच्या व्यवस्थापनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांमध्ये संघटनेने निवेदनात म्हटले आहे की ऊस तोडणी कामगारांना प्रतिटन चारशे रुपये मजुरी मिळावी. मुकादमांना 50 टक्के कमिशन मिळावे. वाहतूकदारांना किलोमीटर प्रमाणे वाढीव दर देण्यात यावेत. 

कामदारांना बोनस ग्रॅच्युईटीचा हक्क मिळावा
कामगारांच्या कुटुंबांना रेशन दुकानदाराचा मार्फत प्रतिमहा 30 किलो धान्य द्यावे. कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू कराव्यात. कामगारांना प्रॉव्हिडंंड फंड व ग्रॅच्युईटीच्या हक्क व बोनस यांची रक्कम शासनाने व कारखान्याने भरावी. राज्यात साखर महासंघ ,कामगार अधिकारी व कामगार प्रतिनिधी यांची समिती तयार करण्यात यावी. उसतोडणी कामगारांसाठी लवादाची नेमणूक रद्द करून दर तीन वर्षांनी करार करण्यात यावे. 

नंदुरबार जिल्ह्यातूनच वाहतूकदार व मुकादम यांची नेमणूक व्हावी बाहेरील मुकादम यांना स्थान देण्यात येऊ नये. अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर संघटनेचे कोषाध्यक्ष व माकपचे जिल्हा सचिव नथू साळवे ,संघटनेचे जिल्हा सचिव खंडू सामुद्रे ,बंनूभाऊ माळी, सुनील गायकवाड ,रामसिंग मोरे , हमीद शहा, सुभाष ठाकरे, श्रावण ठाकरे, प्रताप ठाकरे ,सुदाम ठाकरे ,उखा ठाकरे ,सुपडू ठाकरे ,भगवान सोनवणे आदिंच्या सह्या आहेत.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे