सीसीटिव्हीच्या माध्यमातून शोधला लाखाचा धनी 

state bank cash
state bank cash

तळोदा : बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडून एक लाख रुपये जास्तीचा भरणा झाला असल्याचे सायंकाळी कॅशच्या हिशेब करताना लक्षात आले. ती रक्कम कोणत्या ग्राहकाची आहे, हे तपास करून बँकेच्या रोकड अधिकाऱ्याने ती एक लाख रुपये जास्तीची रक्कम बँक ग्राहकास प्रामाणिकपणे परत केले. भारतीय स्टेट बँकेच्या तळोदा शाखेतील रोकड अधिकाऱ्याने दाखविल्याने या प्रामाणिकपणाचे शहरात कौतुक होत आहे. 


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तळोदा शाखेत ७ जुलैस नीलिमा शिवाजी पावरा ही महिला बँक खात्यात भरणा करण्यासाठी मुलासोबत आली होती. त्यांच्याकडील हॅन्डबॅगमधील रक्कम त्यांनी खात्यावर भरण्यासाठी पावतीसह काउंटरवर रोकड अधिकारी असलेले सागर भोंडवे यांच्याकडे दिली. रक्कम मोजण्यासाठी त्यांनी त्यांच्यासमोरील काउंटरवर ठेवली. त्यात रक्कमेचा हिशेब करून ग्राहक महिलेस पावती दिली. मात्र सायंकाळी एकूण रक्कमेचा हिशेब करताना एक लाख रुपयांची रक्कम जास्तीचे भरत होती. म्हणून त्यांनी रात्री साडेआठ पावेतो हिशेब केला. 


सीसीटीव्ह चेक करत घेतला शोध
दुसऱ्यादिवशी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासणी केले. सीसीटीव्हीत महिला आपल्या बॅगेतून रक्कम काढताना दिसली. त्यात त्यांनी बॅगेतून जास्तीची रक्कम दिली असावी, अशी शक्यता लक्षात घेऊन त्या ग्राहक महिलेस बँकेत बोलविण्यात आले. त्यात त्यांना भरणा करण्यासाठी दिलेल्या रकमेबद्दल विचारणा करून व त्यांचा बॅगेतील एकूण रक्कमेचा हिशेब जुळविला. शाखाधिकारी बिनोदकुमार शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाचा शहानिशा केला. त्यानंतर ते एक लाख रुपये त्या महिलेचेच असल्याचे सिद्ध झाले. ते त्या महिलेला परत करून त्यांच्या खात्यावर जमा केले. स्टेट बँक इंडियाचा तळोदा शाखेतील अधिकारी व कर्मचा-यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक आणि समाधान व्यक्त होत आहे. 
 
भरणा करण्यासाठी पावतीवर लिहिलेली रक्कम व पावतीवरील नोटांच्या हिशेब जुळत होता. त्यामुळे भरणा करून पावती दिली. मात्र त्यांनी त्यांच्या बॅगेतून रक्कम काढली होती. ती सर्व दिली होती. मी रक्कम आणि पावतीवर असलेला हिशोब तपासला व भरणा केला. त्यात इतर बंडल सोबत रक्कम मिसळली होती. ते तेव्हा लक्षात आले नाही. मात्र सायंकाळी रक्कम अधिक भरत होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासून ग्राहकाला रक्कम परत केली आहे.त्याचे समाधान आहे. 
-सागर भोंडवे,रोकड अधिकारी, भारतीय स्टेट बँक शाखा तळोदा 
 

संपादन : राजेश सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com