जानवे येथे तलवार हल्ल्यात पती- पत्नी जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

 अमळनेर : जानवे (ता. अमळनेर) येथे पती- पत्नीवर एका तरुणाने तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी (ता.. 11) सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. जखमी पती- पत्नी यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. 

जानवे येथे इंदूबाई हिलाल निकुम या समाजाच्या जुन्या रूढीप्रमाणे सोमवारी सकाळी नऊला भाकरी मागत होत्या. यावेळी अजय मंगल पारधी या तरुणाने त्यांचा पाठलाग करून सोबत पळून जाण्याचा आग्रह केला. यावेळी वाद उफाळल्याने अजय पारधी याने तलवारीने विवाहितेवर तलवारीने हल्ला केला यात महिलेच्या डाव्या हातावर व पायाला गंभीर दुखापती झाल्या. त्यांच्या पतीच्या डाव्या पायावरही अजयने तलवारीने हल्ला केला. दोघांना उपचारासाठी धुळे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंदूबाई यांच्या फिर्यादीवरून काल (ता.. 12) रात्री उशिरा येथील पोलिस ठाण्यात अजय व त्याची आई मुन्नीबाई मंगल पारधी यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सुभाष महाजन तपास करीत आहेत.  

Web Title: marathi news talvar halla