तळवाडे - ग्रामस्थांनी उभारल्या भगव्या ध्वजाच्या गुढी

रोशन भामरे
रविवार, 18 मार्च 2018

तळवाडे दिगर (जि.नाशिक) : आरंभ होई चैत्रमासीचा, गुढ्या- तोरणे सण उत्साहाचा, केवळ मुखी घालू गोडाचा, साजरा दिन हो, गुढीपाडव्याचा... अशा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर गावात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आज पर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच गावातील प्रत्येक घरावर भगव्या पताका लावून वेगळ्या नव्या परंपरेला आज पासून सुरुवात करण्यात आली.

तळवाडे दिगर येथील सम्राज युवा प्रतिष्ठानच्या वतीने हा नवीन उपक्रम राबविण्यात आला. तसेच संपूर्ण गावातील प्रत्येक घराघरात भगव्या ध्वजांचे वाटप करण्यात आले. व गावातील सर्व नागरिकांना नवीन पद्धतीने गुढीपाडवा कसा साजरा करायचा याविषयी माहिती देणारे एक पत्रकही देण्यात आले. तर यासाठी व्हाटसअँप, फेसबुक आदी सोशल मिडीयावरून जनजागृती करण्यात आली तसेच आज पासून गावात ही नवीन परंपरा सुरु झाली असून संपूर्ण गाव भगवमय झाले होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणासाठी गेल्या एक आठव्यापासून गावातील तरुणांनी धावपळ सुरु केली होती. आज रविवार पासून शिवकालीन परंपरा जोपासत गावतील प्रत्येक घरावर विजयोत्सव म्हणून फक्त भगव्या ध्वजाची गुढी उभारली जावी असा निर्णय संपूर्ण गाव साम्राज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला संपूर्ण गावात ध्वज वाटण्यात आले तसेच गावातील महिलांनी देखील संपूर्ण गावात सकाळी सडा रांगोळ्या काढल्या व भगव्या ध्वजामुळे गावतील वातावरण भगवमय झाले होते.

पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासह भगवा ध्वज फडकवण्याची तयारी अनेकांनी केली होती. नवीन वर्षाच्या शुभेच्छाचा सोशल मिडीयावर पाऊस पडत होता तर चालू वर्षाच्या नवीन परंपरा सुरु करण्यासाठी मोठ्या उत्साहाने आव्हान करण्यात येत होते.  

नव्या हंगामाच्या मशागतीचा प्रारंभ
चैत्राच्या पहिल्या दिवशी कृषीजीवनाचे नवे वर्ष आज.(रविवारी) सुरु झाले तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळी उठून आपल्या नवीन जीवनाच्या नवीन वर्षाला सुरुवात केली सकाळी लवकर उठून आपल्या शेतात जाऊन नांगर जुंपून नवीन वर्षाचे मुहूर्त केले नंतर आपल्या बैलांना अंघोळ घालून त्यांना नैद्वय देण्यात आले. मात्र ही परंपरा काही ग्रामीण भागातील ठराविक गावातील ठरावी शेतकरीच जोपासत असताना दिसून येत आहे.     

Web Title: marathi news talwade nashik news