धामणगावामध्ये तनिष्का गटाची स्थापना

दीपक कच्छवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

गावातील महिलांच्या विकासासाठी सर्वानी 'तनिष्का' च्या माध्यमातून एकत्र येण्याचे आवाहन शोभाताई चव्हाण यांनी केले.तनिष्का गटाच्या स्थापनेमागील भुमिका विशद करताना शोभाताई चव्हाण यांनी राज्यात होणार्‍या कार्यक्रमावर प्रकाशज्योत टाकुन संघटीत होण्याचे आवाहन केले.

मेहुणबारे ता.चाळीसगाव : सकाळ माध्यम समूहा' च्या तनिष्का गटाची धामणगाव (ता.चाळीसगाव) येथे आज स्थापना करण्यात आली. यासंदर्भात  शोभाताई चव्हाण यांच्या निवास्थानी  खेळीमेळीच्या वातावरणात बैठक घेण्यात आली.त्यात स्त्रीप्रतिष्टेचा जागर करून 'सकाळ' च्या माध्यमातून ग्रामविकास निर्धार करण्यात आला. 

धामणगाव  येथील माजी शिक्षिका  शोभाताई चव्हाण यांच्या निवास्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.तनिष्का व्यासपीठ संदर्भात तनिष्का व्यवस्थापक अमोल भट यांनी महिलांना माहिती दिली. बैठकीत  महिलांनी आपपला परिचय करून दिला.गावाचा विकास करण्याचा निर्धार केला. बैठकीला छायाबाई निकम, अनिता निकम, लताबाई निकम, सखुबाई देवकर, रजनी निकम, जयश्री पवार, छायाबाई जगताप, उषाबाई निकम, निर्मलाबाई निकम या तनिष्का सदस्या उपस्थित होत्या. यावेळी उपस्थीतीनी 'तनिष्का' च्या आगामी होणार्‍या विविध कार्यक्रमाच्या संदर्भात चर्चा केली.

गावातील महिलांच्या विकासासाठी सर्वानी 'तनिष्का' च्या माध्यमातून एकत्र येण्याचे आवाहन शोभाताई चव्हाण यांनी केले.तनिष्का गटाच्या स्थापनेमागील भुमिका विशद करताना शोभाताई चव्हाण यांनी राज्यात होणार्‍या कार्यक्रमावर प्रकाशज्योत टाकुन संघटीत होण्याचे आवाहन केले. यावेळी  सुनिल पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: Marathi news Tanishka in Dhamangaon