कोपर्डीतील निर्भयाला कॅंडल रॅली काढून तनिष्कांची श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

सकाळ माध्यम समूहाचा तनिष्का गट व कुलस्वामिनी जोगाई माता बहुउद्देशीय महिला प्रतिष्ठान यांच्यातर्फे गुरुवारी रात्री आठ वाजता कोपर्डी येथील निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅंडल रॅली काढण्यात आली.

कापडणे (ता.धुळे) - सकाळ माध्यम समूहाचा तनिष्का गट व कुलस्वामिनी जोगाई माता बहुउद्देशीय महिला प्रतिष्ठान यांच्यातर्फे गुरुवारी रात्री आठ वाजता कोपर्डी येथील निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅंडल रॅली काढण्यात आली.

गुरुवारी रात्री आठ वाजता सुदर्शन चौक, सुतार चौक आणि आंबेडकर चौकातून कॅंडल रॅली काढण्यात आली. रॅलीला मूक मोर्चाचे स्वरुप प्राप्त झाले होते. निर्भयाला न्याय मिळायला हवी अशी मागणी करत राज्यात महिला मुली असुरक्षित असल्याबद्दल उपस्थित महिलांनी यावेळी चिंता व्यक्त केली. महिलांविरुद्ध दररोज घडणाऱ्या घटनांनी महिला व्यथित होत आहेत. सरकार सुरक्षितता केव्हा पुरविणार असा सवालही महिलांनी उपस्थित केला.

यावेळी तनिष्का गटाच्या अध्यक्षा रेखा सतीश पाटील, तनिष्का समन्वयिका प्रमिला मधुकर पाटील, टाईमकिपर अनिता सुरेश पाटील, सदस्या शुभांगी राजेंद्र पाटील, विद्या युवराज पाटील, रत्ना कैलास पाटील, इंदीरा विजय पाटील, वृंदा जयवंत पाटील, विद्या प्रकाश पाटील, संगिता देवेंद्र जैन, शंकुतला वाघ, सुशिला पाटील, कविता पाटील आदि महिला सहभागी होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला. माजी सरपंच इंदिरा पाटील यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे घेण्याचेही आवाहन केले. प्रमिला पाटील, रत्ना पाटील, शुभांगी पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title: marathi news tanishka news kopardi issue sakal news