महाविद्यालयीन तरुणींकडून  दुकानदार महिलेस मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

महाविद्यालयीन तरुणींकडून 
दुकानदार महिलेस मारहाण 

महाविद्यालयीन तरुणींकडून 
दुकानदार महिलेस मारहाण 

जळगाव : शहरातील आयएमआर महाविद्यालयाजवळील झेरॉक्‍स दुकानावर दोन महाविद्यालयीन तरुणींनी दुकानदार महिलेस मारहाण करून दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली. दुकानातील महिलेस दमबाजी करून गुंडांप्रमाणे या तरुणी निघून गेल्या. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
आजवर, महाविद्यालयात शिक्षण घेणारे तरुणांच्या टोळ्या, हाणामाऱ्यांचे प्रकार नेहमीचे झाले आहे. शहरात अशा टोळ्याही सक्रिय असून, कॉलेज गॅंगवॉरचा बऱ्यापैकी अनुभव आहे. कधीच विद्यार्थिनींनी हाणामारी केल्याचे कानावरही आले नाही. मात्र, आज आएमआर महाविद्यालयाजवळील एका दुकानावर तरुणींनी हाणामारी करून दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडल्याने चर्चेला उधाण आले आहे. दुकानदार, पद्मजा घनश्‍याम पाटील (वय 40, रा. विद्युत कॉलनी) यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, दुपारी एकच्या सुमारास दोन तरुणी त्यांच्या दुकानावर आल्या. पद्मजा यांनी झेरॉक्‍सच्या एका प्रतीसाठी दोन रुपयांची मागणी केल्याने वादाला सुरवात झाली. वाद विकोपाला जाऊन शिवीगाळ, गोंधळ होऊन दोघी तरुणी महिलेच्या अंगावर गेल्या. दुकानाच्या काउंटरचे काचा तोडून नुकसान केले. झटापटीत पद्मजा पाटील यांच्या हातालाही दुखापत झाली आहे, तसेच जाताना धमकावल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news tarunichi marhan