"आप' चे ढोल बजाव, मनसेचे क्रिकेट, पालिकेच्या करवाढीचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

नाशिक _ महासभेने अठरा टक्के करवाढीचा प्रस्ताव मंजुर केल्यानंतर देखील आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन मिळकतींसह मोकळे भुखंडांवरील भाडे योग्य मुल्य दर वाढविण्याचा निर्णय घेतल्याने त्या विरोधात शहरभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

नाशिक _ महासभेने अठरा टक्के करवाढीचा प्रस्ताव मंजुर केल्यानंतर देखील आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन मिळकतींसह मोकळे भुखंडांवरील भाडे योग्य मुल्य दर वाढविण्याचा निर्णय घेतल्याने त्या विरोधात शहरभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सर्वाधिक फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांची ताकद संघटीत करण्यासाठी गावोगावी बैठका होत असताना राजकीय पक्षांकडून आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंढे यांची आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यानंतर जोरदार स्वागत करणाऱ्या आम आदमी पक्षाने करवाढीच्या मुद्यावरून आयुक्तांच्या विरोधात भुमिका घेत घरपट्टीवरील करवाढ पुर्णपणे माफ करावी या मागणीसाठी पालिका मुख्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन तर मनसेच्या विद्यार्थी सेनेतर्फे पालिका प्रवेशद्वारासमोर क्रिकेट खेळून निषेध करण्यात आला. 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने  महापालिकेने अवाजवी करवाढ करताना मोकळ्या भुखंडांवर देखील कर लागु केला आहे. शहरातील महाविद्यालय, मराठी शाळेच्या मैदानांवर कर लावल्यास शाळा व महाविद्यालयांकडून तो कर फी च्या स्वरुपात पालकांकडून वसुल केला जाईल

क्रीडांगणाकडे वेधले लक्ष

 शिक्षण महागेल अशी भिती व्यक्त करतं क्रीडांगणे वाचविण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारासमोर "क्रिकेट' खेळ खेळून दरवाढीचा निषेध करण्यात ाला. यावेळी मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहाराध्यक्ष शाम गोहाड, जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, शशिकांत चौधरी, सौरभ सोनवणे, राहुल क्षीरसागर, अमर जमधडे, स्वप्नील ओढाणे, संदीप पैठण पगार, सुयश मंत्री, प्रसाद घुमरे, प्रशांत बारगळ, सुयश पगारे, सूरज डबाळे, हर्षल ठाकूर आदी उपस्थित होते. 

"आप' चे ढोल बजाव 
आम आदमी पक्षाच्या वतीने पालिका मुख्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. पक्षाचे जितेंद्र भावे, जगबीर सिंग, प्रभाकर वायचळे, स्वप्निल घिया, अनिल कौशिक, विनायक येवले, एकनाथ सावळे, गिरीष उगले-पाटील आदींनी संपुर्ण करवाढ मागे घेण्याची मागणी केली. जीएसटी मुळे महापालिकेच्या उत्पादनात घट झाली आहे. दिडशे कोटी रुपयांची तुट येत असल्याने याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करताना भाडेकरू असलेल्या मिळकतीवर तिप्पट घर आकारणी केल्यास घरमालक व भाडेकरूंची आर्थिक कोंडी होईल. शाळा, मोकळे भुखंडांवरील घरपट्टीत वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होणार असल्याने आयुक्त स्मशानभुमीला घरपट्टी लावणार का असा सवाल निवेदनातून करण्यात आला आहे. 
 

Web Title: marathi news tax increased