शिक्षक मतदार संघात 90टक्क्यापेक्षा अधिक अंदाज,मतदान सुरुच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नाशिकः  नाशिक शिक्षक मतदार संघात आज सकाळपासून दिवसभर पावसासोबत मतदानाचा पाउस सुरु होता. दुपारपर्यत हलक्‍या ते मध्यम स्वरुपाची पावसाची रिपरिप होती. दुपारी तीननंतर पावसाचा वेग वाढल्यानंतरही शिक्षकांचे उत्साहात मतदार सुरु होते.सायकाळी सहापर्यत नव्वद टक्कयाहुन अधिक मतदान नोंदवले गेले. रात्री उशिरापर्यत मतदान केंद्रांत रांगा लागल्या होत्या. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज नाशिक,जळगाव नगर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी संततधारेतही उशीरापर्यत गर्दी मतदानासाठी रांगा होत्या. पाचपर्यत मतदानाच्या रांगेत असलेल्या मतदारांना अनेकांना सहापर्यत मतदान सुरु होते. नाशिकला बी.डी.भालेकर केंद्रावर आमदार नरेंद्र दराडे यांनी बेडसे समर्थक शिक्षकाला शिवीगाळ केल्यावरुन वाद झाला हा अपवाद वगळता, सगळीकडे पावसात मतांचा पाउस असेच चित्र होते. 
 
Web Title: marathi news teacher election

टॅग्स