नाशिक शिक्षकमधून शिवसेना पुरस्कृत दराडेंची आघाडी कायम

live
live


नाशिक : विधानपरिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांनी 40 हजार मतांमध्ये पावणेसहा हजार मतांनी आघाडी कायम ठेवली.
टीडीएफ मधील फुटीचा दराडे यांनी फायदा उचलल्याचे आतापर्यंतच्या मतमोजणी वरून स्पष्ट होते. 

अंबड मधील मध्यवर्ती गुदामात मतमोजणीला सुरु आहे. ४0 हजार मतांची मोजणी सायंकाळ पर्यंत चालली. त्यात उमेदवार निहाय मिळालेली मते अशी : किशोर दराडे-13957, टीडीएफ चे संदीप बेडसे-8232, भाऊसाहेब कचरे- 4753, आप्पासाहेब शिंदे-2982, भाजप अनिकेत पाटील-4792, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे-534, शिक्षक परिषद चे सुनील पंडित-288, शालीग्राम भिरुड-2482.

दुसऱ्या टप्याखेर 1341 मते अवैध ठरली असून 75 नोटा नोंदविण्यात आला. आता 9 हजार मतांची मोजणी सुरू झाली आहे. सर्व मते मोजल्यावर वैध, अवैध आणि नोटा मते निश्चित होतील. मग वैध मते भागीले 2 अधिक 1 असा विजयाचा कोटा ठरेल. 29 हजार मतांमधून कोटा पूर्ण न झाल्यास पसंतीक्रम मोजला जाईल, त्याच्या 14 फेऱ्या होतील. त्यातही कोटा पूर्ण न झाल्यास 2 उमेदवार पैकी अधिक मते मिळवणारा उमेदवार विजयी म्हणून घोषित होईल
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com