महामार्गावरील टेहरे फाट्यावर अपघात, एक ठार दोन जखमी.

residentional photo
residentional photo

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे फाट्यावर ट्रकने-दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण ठार तर पाठीमागे बसलेले दोघे तरूण जबर जखमी झाले. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला.

या अपघातात जमील अहमद खुर्शीद अहमद (20, रा.नयापूरा) हा जबर जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डाँक्टरांनी त्यास मयत घोषीत केले. यात मोहंमद इब्राहीम निहाल अहमद (16), अर्शद अतीक अहमद (17, दोघे रा.नयापूरा, मालेगाव) हे जखमी झाले. जखमींवर   सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  छावणी पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरूध्द (आरजे-39, जीए- 3286) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com