धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी गुरुवारी कृती समितीची बैठक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

नाशिक : महापालिकेतर्फे 503 धार्मिक स्थळे हटविण्याच्या नोटीस बजावल्यानंतर वाद निर्माण झाला असून त्या वादाचे पडघम आता खुल्या मैदानात वाजणार आहे. गुरुवारी (ता. 11) धार्मिक स्थळे बचाव कृती समितीने गंगाघाटावरील यशवंत महाराज पटांगणावर धार्मिक स्थळ विश्‍वस्तांची बैठक बोलाविण्यात आली आहे. बैठकीला नगरसेवकांना देखील निमंत्रित करण्यात आले असून कोणाची भिड न ठेवता चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान पालिकेच्या कारवाई विरोधात मंगळवारी (ता. 9) पुन्हा उर्वरित धार्मिक स्थळांच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळे हटविण्याबाबत महापालिकेला निर्देशित केले होते त्यानुसार दोन वर्षापुर्वी शहरात स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. सन 2009 पुर्वीची 575 तर नंतरही 169 धार्मिक स्थळे आढलली. सन 2009 नंतरची वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यांपुर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोकळ्या भुखंडावरील 575 अतिक्रमणे हटविण्याची नोटीस बजावली त्यापैकी 72 धार्मिक स्थळांच्या विश्‍वस्तांनी धार्मिक स्थळ बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली. परंतू प्रशासनाने 72 वगळला अन्य धार्मिक स्थळांना स्थगिती न दिल्याचे कारण देत दोन दिवसांपासून नोटीसा चिपकविण्यास सुरुवात केल्याने ऐनसणासुदीच्या काळात तेढ निर्माण झाला आहे. 

Web Title: marathi news temple and religious spots