नाशिकचे तापमान गाठणार चाळीशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नाशिक : राज्यात मुंबईसह नाशिकमध्ये यंदा तापमान यंदा चाळीशी पार करणार आहे. मुंबईतील काल (ता.25) च्या उच्चांकी तापमान नोंदीनंतर नाशिकलाही पारा 41
अंशापर्यत पोहोचण्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. 

नाशिक : राज्यात मुंबईसह नाशिकमध्ये यंदा तापमान यंदा चाळीशी पार करणार आहे. मुंबईतील काल (ता.25) च्या उच्चांकी तापमान नोंदीनंतर नाशिकलाही पारा 41
अंशापर्यत पोहोचण्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. 

हवामान विभागाने आजच तशा इशारा दिला असून येत्या दोन तीन दिवसांत नाशिकचे तापमान 41 अंश सेल्सियसपर्यत पोहोचू शकते. असा इशारा दिला आहे. यंदाचा उन्हाळा नागरिकांना चांगलाच तापविणार आहे. यापूर्वी 1956 आणि त्यानंतर 2011 मध्ये पारा 41 अंशाच्या पुढे गेला आहे. यंदा पून्हा तसाच अंदाज असल्याने ऊन नाशिककरांना भाजून काढणार असेच संकेत आहे. यंदाचा उन्हाळा जास्त दाहक असणार आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबई विभागाने तसा इशारा दिला आहे. काल (ता.25) मुंबईत सांताक्रूजला 41 अंशापर्यत तापमान पोहोचल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील गेल्या 10 वर्षातील हे उच्चांकी तापमान राहिले आहे. 

मुंबई सोबतच नाशिकलाही तापमान वाढीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या आठ वर्षात आतापर्यत केवळ एकदाच तापमान वाढले आहे. 2008 ते 2015 अशा आठ वर्षात केवळ 2011 मध्ये पारा विक्रमी 41.3 पर्यत पोहोचला होता. तेव्हापासून आणि त्यापूर्वी साधारण 8 वर्षे एवढ्या तीव्र उन्हाळ्याला तोंड द्यावे लागलेले नाही. यापूर्वी 1956 मध्ये सर्वाधीक 41.7 पर्यत तापमान वाढीचा उल्लेख आहे. 

उष्णतेची दाहकता 
वर्ष सरासरी तापमान 
2008 35.7 
2009 37.8 
2010 38.0 
2011 41.3 
2012 39.5 
2013 40.5 
2014 38.0 
2015 40.8 
 

Web Title: marathi news tempture