तिवरे धरण फुटी प्रकरणी जलसंपदा  मंत्र्याच्या राजीनाम्याची कॉग्रेसची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

नाशिकः तिवरे धरण फुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी स्विकारत जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी युवक कॉंग्रेसने केली आहे. युवक कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता.22) जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन देण्यात आले. 

युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव कल्याणी रांगोळे, भास्कर गुंजाळ, दिनेश चौथवे, रा. का. पाटील, त्रिरश्‍मी तिगोटे. मनोज पाईक राव, ऍड. अभिमन्यु गोवर्धने, दर्शन पाटील आदींनी निवेदन देत, राजीनाम्याची मागणी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनेत निष्पापांचे बळी गेले. या दुर्घटनेनंतर धरण सुरक्षेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. नाशिकच्या डीएसओ या धरण सुरक्षाविषयक संस्थेने सरकारला यापूर्वीच अनेक अहवालातून कोकणांमधील धरणांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मान्सून पूर्व आणि नंतर धरणांच्या तात्काळ दुरूस्तीच्या सूचना दिल्या असतांना, तिवरे धरण दुर्घटना घडल्याने श्री महाजन व श्री सावंत यांनी जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news TIVRE DAM