सलग सुट्यांमुळे चाकरमानी पर्यटनस्थळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

जुने नाशिकः सलग सुट्यांमुळे चाकर मान्याना पर्यटनाचे वेध लागले आहे. खाजगी ट्रॅव्हल कार्यालयसह बस स्थानकावर प्रवाश्‍यांची गर्दी वाढली असल्याचे बघवायस मिळत आहे. 
सोमवार वगळता शनिवार, रविवार आणि मंगळवार अशा सुट्या येत आहे. याची संधी साधत चाकर मान्याची सोमवारी एक दिवसाची सुट्टी टाकत सलग चार दिवस सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यानी सोमवारी सुट्टीचे अर्ज केले असल्याचे माहिती समोर आली आहे. सुट्टी अनेकानी सुटीमध्ये गावी जाण्याचा तर काहीनी पर्यटनाचा आनंद घेण्याचे नियोजन केले आहे. 

शासकीय कार्यालयात या चारही दिवसात शुकशुकाट असणार आहे. शिवाय त्यानंतरही अनेकामध्ये सुट्टीच्या दिवासानंतर काही दिवस सुट्टीचा फिवर असतो. तसेच वर्ष आखेर यामुळे हा संपूर्ण सप्ताह सुट्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे अनेक महत्वाची कामे रेगांळण्याची शक्‍यता आहे. तर दुसरीकडे सुट्यांचा पुरेपुर फायदा घेण्यासाठी नागरीकांनी गावी जाण्यासह पर्यटनाचा बेत आखला आहे. त्यानिमित्ताने खजागी ट्रॅव्हर्ल्स कार्यालय आणि बस स्थानकात प्रवाशाची गर्दी वाढली आहे.

ठक्कर बाजारा बसस्थानकात शुक्रवारपासूनच प्रवाशाची गर्दी दिसत होती. शनिवारी प्रवास्यांमध्ये आणखीच वाढ झाली होती. खाजगी टॅव्हर्ल्सचे एजंटकडून बस स्थानकातील प्रवासीही पळविण्याचे प्रकार सर्रास सुरु होते. त्याचप्रमाणे आरक्षण खिडक्‍यांवर प्रवास्यांनी रांगा लावल्याचे चित्र बघावयास मिळाले. बॅंकेसही शनिवार रविवार सुट्टी असल्याने बऱ्याच नागरीकांनी खात्यातील रक्कम काढण्यासाठी शुक्रवारी बॅंकेत गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळाले. तर सुट्टीमध्ये नागरीकाना एटीएमवर अवलंबून रहावे लागणार असल्याने एटीएम केंद्राच्या बाहेर रांगा बघावयास मिळणार आहे. 

Web Title: marathi news tourist place in maharashtra