व्यापारी गाळ्यांची नोंदणी,विभागीय अधिकाऱ्यांना आदेश 

residentional photo
residentional photo

नाशिकः महापालिकेच्या मिळकती सील करण्यावरून शहरात वाद निर्माण झाला असताना आता पालिकेच्या व्यावसायिक गाळ्यांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. थकबाकीदार व करारनामा नसतानाही गाळे ताब्यात असलेल्या गाळेधारकांना गाळ्यांची दुय्यम निबंधकांमार्फत नोंदणी करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 
बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने सहा विभागांत एकूण 62 व्यापारी संकुले उभारली असून, त्यात 2,079 गाळ्यांची निर्मिती केली आहे; परंतु अनेक गाळे नाममात्र दराने भाडेतत्त्वावर देण्यात आले. काही गाळ्यांचे करारनामेच झाले नसल्याचे एका पाहणीत आढळले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com